सोनारी फाट्याजवळ भीषण अपघात! दोन ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 10:49 PM2022-09-24T22:49:15+5:302022-09-24T22:49:40+5:30

दोघे चालक आणि तीन मजुरांचा समावेश. पाच जण गंभीर जखमी झाले.

Horrible accident near Sonari Phata nanded! Five people died on the spot in a collision between two trucks | सोनारी फाट्याजवळ भीषण अपघात! दोन ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार

सोनारी फाट्याजवळ भीषण अपघात! दोन ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार

Next

हिमायतनगर (जि. नांदेड) : तालुक्यातील सोनारी फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच जण जागीच ठार झाले असून, पाच जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात शनिवारी (दि. २४) सायंकाळी झाला.

सोनारी फाट्याजवळ सायंकाळी सातच्या दरम्यान भोकर ते चंद्रपूर जाणारा ट्रक (एम. एच. २६- बी १०११) आणि हिमायतनगर ते जवळगाव जाणाऱ्या ट्रकची (एम. एच. ३७ - जे ००१६) समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. यात दोन्ही वाहनातील ड्रायव्हरसह तीन मजुरांचा मृतांमध्ये समावेश आहे. सर्वच परराज्यातील असल्याने ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती.

‘ते’ मजूर पश्चिम बंगालमधील

या भागात रेल्वे इलेक्ट्रिसिटीचे काम जोरात सुरू आहे. या कामासाठी पश्चिम बंगालमधून (मालदा) काही मजूर आले असून ते किनवट तालुक्यातील सावरगाव येथे भाड्याच्या घरामध्ये राहत होते. काम आटोपून ते ट्रकने सावरगाव येथे जात असताना हा अपघात झाला.

जखमींमध्ये हिमायतनगरचा मजूर

पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये अरविंद शिवाजी बनसोडे हा हिमायत नगरचा असून इतर चौघे पश्चिम बंगाल मधील मालदा येथील राहणारे आहेत.

घटनास्थळी धावले नागरिक

नागरिकांनी घटनास्थळी लगेचच धाव घेत सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथे त्यांना हलविण्यात आले. सर्वजण तिशीच्या आतील आहेत. 

मयतांची नावे
शेख रफीक समशेरदीन (वय २५, रा. मालदा प.बंगाल),  मोहम्मद नबिरूदीन मोहम्मद खमूरीदीन (वय २७, रा. मालदा प. बंगाल), धिक्कन मो.तालम मो.(१९, रा. मालदा प. बंगाल), ट्रकचालक प्रकाश मारोती गिमेकर (४५, रा.  फुलेनगर हिमायतनगर), ट्रक चालक 
साईनाथराव बाबाराव पांचाळ (वय ४३, रेनापूर ता. भोकर)

Web Title: Horrible accident near Sonari Phata nanded! Five people died on the spot in a collision between two trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.