Himalaya bridge accident accused the executive engineer arrested | Video : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा कार्यकारी अभियंत्याला अटक
Video : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा कार्यकारी अभियंत्याला अटक

ठळक मुद्देकलकुटेला आज न्यायालयात हजर केले असता ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही पहिली अटक असून दुसरी अटक काल एस. एफ. कलकुटे याला करण्यात आली. 

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेचा सहाय्यक अभियंता एस.एफ. कलकुटे याला काल आझाद मैदान पोलिसांनीअटक केली. त्याच्यामागोमाग पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही तिसरी अटक असून कार्यकारी अभियंत्याचे नाव अनिल पाटील असं आहे. 

कलकुटेला आज न्यायालयात हजर केले असता ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.१४ मार्च रोजी गर्दीच्यावेळी सीएसएमटी येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा ठार व अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर रेल्वे व महापालिकेच्या बेजबाबदार कार्यपद्धतीबद्दल टीकेची झोड उठली होती. या प्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीराजकुमार देसाईला याआधी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही पहिली अटक असून दुसरी अटक काल एस. एफ. कलकुटे याला करण्यात आली. 


Web Title: Himalaya bridge accident accused the executive engineer arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.