हायप्रोफाइल खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV तून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 10:39 AM2021-07-29T10:39:54+5:302021-07-29T10:42:20+5:30

Dhanbad Judge Death : झारखंड पोलिसांनी सात पथकांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे.

High-profile judge dies in road accident in dhanbad, jharkhand, shocking information comes out by CCTV footage | हायप्रोफाइल खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV तून समोर आली धक्कादायक माहिती

हायप्रोफाइल खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV तून समोर आली धक्कादायक माहिती

Next
ठळक मुद्देपोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्या अँगलने तपास सुरू आहे.

धनबाद: एका हायप्रोफाइल खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा रस्ते अपघातात बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली. पण, आता पोलिसांच्या हाती लागलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकवर निघालेले जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांचा मृत्यू अपघातात झाला नसून, त्यांना एका ऑटोने मुद्दामून धडक दिल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. 

माजी आमदाराच्या जवळचा असलेल्या रंजय हत्याकांडासारख्या अनेक महत्वाच्या खटल्यांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्या अँगलने तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी जातीने याप्रकरणात लक्ष्य देत असून, दोषींना लवकर पकडले जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, धनबादच्या स्थानिक आमदाराने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

सीसीटीव्हीमध्ये नेमंक काय आहे ?
धनबादच्या जिल्हा सत्र न्यायालयातील न्‍यायाधीश उत्तम आनंद बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. शहरातील रणधीर वर्मा चौकाजवळ एका ऑटोने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. सुरुवातीला हा अपघात वाटला होता, पण सीसीटीव्हीत दिसले की, रस्त्याने सरळ जाणारा ऑटो मुद्दामून किनाऱ्याने चालणाऱ्या उत्तम आनंद यांना धडक देत आहे. आता पोलिस या प्रकरणाचा हत्येच्या अँगलने तपास करत आहे.

Web Title: High-profile judge dies in road accident in dhanbad, jharkhand, shocking information comes out by CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.