Heartbreaking! The body of the mother was found in a burnt condition along with the baby | हृदयद्रावक! बाळासह आईचा जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

हृदयद्रावक! बाळासह आईचा जळालेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

छत्तीसगड - हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जाळल्याची घटना ताजी आहे. या घटनेमुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमठत आहेत. त्यातच आता छत्तीसगडमध्ये देखील एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी एका महिलेसह तिच्या बाळाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे.

रायपुरमधील नक्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत याबाबत नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. छत्तीसगडधील बलरामपुरमध्ये पोलिसांना एक तरूणीचा जळालेला मृतदेह आढळला. या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

Web Title: Heartbreaking! The body of the mother was found in a burnt condition along with the baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.