तुझ्यासाठी बायकोला सोडले आणि तू नकार देतेस! असं म्हणत प्रेयसीला भररस्त्यात बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 03:56 PM2020-10-17T15:56:01+5:302020-10-17T15:58:14+5:30

Crime News : आरोपीला दोनच तासात पोलिसांनी केली अटक

He left his wife for you and you refuse! Saying this, he beat his beloved to death | तुझ्यासाठी बायकोला सोडले आणि तू नकार देतेस! असं म्हणत प्रेयसीला भररस्त्यात बेदम मारहाण

तुझ्यासाठी बायकोला सोडले आणि तू नकार देतेस! असं म्हणत प्रेयसीला भररस्त्यात बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देवरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी या प्रकरणाचा तपास दीपक सवरेदय यांना दिला. त्यांनी अवघ्या 2 तासाच आरोपीला अटक केली आहे. कल्याण पूर्वतील कचोरे परिसरात राहणाऱ्या एका तरुणी ही कल्याण पश्चिमेतील सवरेदय मॉलमध्ये कामाला आहे.

कल्याण - तुझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आत्ता लग्नाला का नकार देतेस असे बोलून प्रियसीला बेदम मारहाण करणाऱ्या प्रियकराला कल्याण येथील महात्मा फुले पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. अजित कनोजिया असे या प्रियकराचे नाव आहे.


कल्याण पूर्वतील कचोरे परिसरात राहणाऱ्या एका तरुणी ही कल्याण पश्चिमेतील सवरेदय मॉलमध्ये कामाला आहे. ही तरुणी आपले काम आटोपून मॉलच्या खाली असता एका तरुणाने तिच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर तिला भर रस्त्यात मारहाण सुरु केली. काही नागरीकांनी या तरुणाला पकडले. मात्र तो पळून गेला. तरुणाचे नाव अजित कनोजिया असून काही वर्षापासून त्याचे या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. अजित हा विवाहित आहे. विवाहित असताना या तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु होते. दहा दिवसापूर्वी आपल्या या प्रिससीसाठी अजितने आपल्या पत्नीला सोडले होते. पत्नीला सोडल्यानंतर या तरुणीला वारंवार लग्नासाठी गळ घालत होता. तरुणीने त्याला लग्नासाठी नकार दिला. कालपण तो आला. त्याने तिला सांगितले की, तुझ्यासाठी बायकोला सोडले आहे. तू आत्ता लग्नाला का नकार देत असा विचारले. त्यावरुन त्यांच्या वाद झाला. या वादातून त्याने तिला मारहाण केली. या प्रकरणी तरुणीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बनकर यांनी या प्रकरणाचा तपास दीपक सवरेदय यांना दिला. त्यांनी अवघ्या 2 तासाच आरोपीला अटक केली आहे.

Web Title: He left his wife for you and you refuse! Saying this, he beat his beloved to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.