Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना

By पूनम अपराज | Published: October 12, 2020 02:07 PM2020-10-12T14:07:01+5:302020-10-12T14:07:52+5:30

Hathras Gangrape : पीडितेच्या कुटूंबाच्या घरापासून कडक सुरक्षेमध्ये हाथरसमधून तपास यंत्रणांच्या ताफासह पिडीतेचे कुटुंब लखनऊला रवाना झाले.

Hathras Gangrape: The victim's family left for Lucknow for hearing under tight security | Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना

Hathras Gangrape : कडक बंदोबस्तात पीडितेचे कुटुंबीय सुनावणीसाठी लखनऊ झाले रवाना

Next
ठळक मुद्देसामुहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर हाथरसमध्ये पोलिसांचा फौजफाटा ठेवत वाद ओढवून घेतलेल्या उत्तर प्रदेश सरकारने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.

उत्तर प्रदेशच्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात आज होणार आहे. कडक सुरक्षेत पीडितेचे कुटुंब न्यायालयात हजर राहणार आहे. यासह कोर्टाने या प्रकरणातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही समन्स बजावले आहे. पीडितेच्या कुटूंबाच्या घरापासून कडक सुरक्षेमध्ये हाथरसमधून तपास यंत्रणांच्या ताफासह पिडीतेचे कुटुंब लखनऊला रवाना झाले. त्यांच्यासह सीओ आणि मॅजिस्ट्रेट देखील असून आजचा दिवस महत्वाचा आहे. सीबीआय देखील याप्रकरणी तपासात सक्रिय झालं आहे. 

सामुहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर हाथरसमध्ये पोलिसांचा फौजफाटा ठेवत वाद ओढवून घेतलेल्या उत्तर प्रदेश सरकारने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. यावर सीबीआयने सूत्रे हाती घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी टीम बनविली आहे. सीबीआयने एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. या आधी पीडितेच्या भावाने हाथरसच्या चंदपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 14 सप्टेंबरला आरोपीने त्याच्या बहिणीचा बाजरीच्या शेतामध्ये गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पीडितेच्या भावाने केला होता.


बलात्काराच्या घटनेला 27 दिवस झाले आहेत. आधी हाथरस पोलीस नंतर एसआयटी व आता सीबीआय असा तपास होत आहे. सध्या याची चौकशी एसआयटी करत होती. 14 सप्टेंबरला एसआयटी स्थापन करण्य़ात आली होती. त्यांनी गावातील 40 लोकांची चौकशी केली होती. हे लोक घटनेच्या वेळी आजुबाजुच्या शेतात काम करत होते. यामध्ये आरोपी आणि पीडितेचे कुटुंबही आहेत. दरम्य़ान हाथरस पीडितेचे कुटुंबीय लखनऊला जात आहेत. उत्तर प्रदेशपोलिसांची टीम त्यांना घेऊन जात आहे. सुनावणीसाठी पीडितेच्या घरातील ५ जण आणि काही नातेवाईक जाणार आहेत. डीआयजी शलभ माथूर यांनी पीडितेच्या गावी जाऊन परिस्थीतीची पाहणी केली. 1 ऑक्टोबरला अलाहाबाद न्यायालयाने राज्याच्या सचिवांसह मोठ्या अधिकाऱ्यांसह हाथरसचे जिल्हाधिकारी यांना बोलावले होते.

 

Web Title: Hathras Gangrape: The victim's family left for Lucknow for hearing under tight security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.