संतापजनक! वर्गात शिट्टी वाजवली म्हणून 40 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; 10 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:40 PM2021-09-07T14:40:09+5:302021-09-07T14:46:45+5:30

40 students beaten with sticks in school, 10 hospitalised : संतापलेल्या शिक्षकांनी वर्गातील तब्बल 40 विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारले. सोशल मीडियावर मुलांच्या शरीरावरील जखमा दाखवणारे काही फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत.

Haryana 40 students beaten with sticks in school, 10 hospitalised | संतापजनक! वर्गात शिट्टी वाजवली म्हणून 40 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; 10 जण गंभीर जखमी

संतापजनक! वर्गात शिट्टी वाजवली म्हणून 40 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; 10 जण गंभीर जखमी

googlenewsNext

नवी दिल्ली - हरिणायामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 40 विद्यार्थ्यांना शिक्षकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत दहा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी मुलांच्या पालकांकडून शिक्षकांविरोधातपोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्गात शिट्टी वाजवल्याच्या कारणावरून मुलांना अमानुष मारहाण करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना परिसरातील एका सरकारी शाळेत सोमवारी सकाळी ही घटना घडली. 11 वाजताच्या दरम्यान अकरावीतील काही विद्यार्थ्यांनी वर्गात शिट्टी वाजवली. शिट्टी कोणी वाजवली अशी विचारणा शिक्षकांनी केली असता कोणीच उत्तर दिले नाही. सगळे शांत बसल्याचं पाहून संतापलेल्या शिक्षकांनी वर्गातील तब्बल 40 विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारले. सोशल मीडियावर मुलांच्या शरीरावरील जखमा दाखवणारे काही फोटो जोरदार व्हायरल झाले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मांगे राम, रजनी आणि चरणजित सिंह या तीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. 

मुलांनी पालकांना सांगितल्यास रस्टिकेट करण्यात येईल अशी दिली धमकी

चरणजीत सिंह नावाच्या शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेबद्दल मुलांनी पालकांना सांगितल्यास त्यांना रस्टिकेट करण्यात येईल, अशी धमकी चरणजीत सिंह या शिक्षकाने दिली, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याच्या बनावट प्रकरणात अडकवून मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलांच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Haryana 40 students beaten with sticks in school, 10 hospitalised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.