भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 10:08 PM2020-10-28T22:08:37+5:302020-10-28T22:09:08+5:30

४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघल्यामुळे तिच्या अंगात काही तरी येत असल्याच्या अंधश्रद्धेपोेटी पतीनेच मांत्रिकाला घरी आणून त्याच्यासमक्ष पत्नीच्या अंगातील भूत काढण्याकरिता पूजा करवून घेतली.

Harassment of a woman under the pretext of exorcism | भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; पतीविरोधात गुन्हा दाखल

भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; पतीविरोधात गुन्हा दाखल

Next

अमरावती : भूतबाधा झाल्याचे सांगून तथाकथित मांत्रिकाने मांडलेल्या पूजेत विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक आणि पतीविरूद्ध भादंविची कलम ३५४, ५०९, ५०६, ३४ महाराष्ट्र नरबळी व इतर अनिष्ठ प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ नुसार गुन्हा नोंदविला. ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास महादेवखोरी येथे घडली. 
 
राजू गणेश गुडधे (३५, रा. पंचशीलनगर), असे गुन्हा दाखल झालेल्या मांत्रिकाचे व महेंद्र पांडे (४५, रा. महादेवखोरी), असे पूजेला संमती देणाºया पतीचे नाव आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
पोलीससूत्रानुसार, ४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघल्यामुळे तिच्या अंगात काही तरी येत असल्याच्या अंधश्रद्धेपोेटी पतीनेच मांत्रिकाला घरी आणून त्याच्यासमक्ष पत्नीच्या अंगातील भूत काढण्याकरिता पूजा करवून घेतली. मांत्रिकाने महिलेच्या अंगाला हळदी लावून तिला स्पर्श करून विनयभंग करताच या प्रकराला विरोध दर्शविला. त्यामुळे तिला धमकीही देण्यात आली. मात्र, तिने बुधवारी मांत्रिक व पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली. 

घरीच मांडली पूजा
हळदीपात्र, कुंकू, लिंबू, गडव्यात घरी पूजा मांडण्यात आली. पूजा करण्यास महिलेचा विरोध असतानाही बळजबरीने पूजा करवून घेतली. यावेळी मांत्रिकाने तिच्या अंगावर हळदी लावून स्पर्श केला.


मांत्रिकाने विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरून दोघांवर गुन्हा नोंदविला. याप्रकरणी घटनास्थळावर जाऊन तपास करण्यात येईल.
- पुंडलिक मेश्राम, ठाणेदार फ्रेजरपुरा पोलीस ठाणे, अमरावती

Web Title: Harassment of a woman under the pretext of exorcism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.