कोटींचा गंडा घालून फरार झालेला गुलशन शेवटी गोवा पोलिसांना आला शरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 07:27 PM2020-08-03T19:27:13+5:302020-08-03T19:39:29+5:30

चार दिवसांची पोलीस कोठडी

Gulshan, who escaped after duped crores of rupees, finally surrendered to Goa police | कोटींचा गंडा घालून फरार झालेला गुलशन शेवटी गोवा पोलिसांना आला शरण

कोटींचा गंडा घालून फरार झालेला गुलशन शेवटी गोवा पोलिसांना आला शरण

Next
ठळक मुद्दे रविवारी त्याने दक्षिण गोव्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात येउन शरणागती पत्करली. न्यायालयापुढे त्याला उभे केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

मडगाव : तब्बल १ कोटी २0 लाखांचा गंडा घालून फरार असलेला गोव्यातील आर्लेम येथील आयसीआयसीआय बँकेतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक गुलशन गुसाय हा अखेर पोलिसांना शरण आला. रविवारी त्याने दक्षिण गोव्यातील मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात येउन शरणागती पत्करली. न्यायालयापुढे त्याला उभे केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.


मागच्या आठवडयात येथील दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने गुसाय याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यावेळी न्यायालयाने आपल्या आदेशात संशयिताला ाा पोलीस कोठडीत ठेवून त्याची चौकशी करणे उचित ठरेल असे निरीक्षण नोंदविले होते. आर्लेम येथील शाखेत व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना गुसाय याने अमृतनगर घोगळ येथील साईनाथ पै . काणे नावाच्या एका इसमाला १ कोटी २0 लाखांचा गंडा घातला होता. आयसीआयसीआय या प्रुडन्शियल लाईफ इन्शुरन्सची प्रिमियर भरण्यासाठी धनादेश दया असे सांगून त्याने तक्रारदाराकडून कोºय धनादेशावर स्वाक्षरी घेउन परस्पर ती रक्कम दुसरीकडे वळवली होती.याप्रकरणी काणे यांनी नंतर मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती. भादंसंच्या ४२0,४0३,४0६,४0९,४१८,४६८व ४७१ कलमाखाली त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर गुसाय हा फरार झाला होता. दरम्यान नंतर त्याने अटकपुर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.


पुणे येथील औंध येथे राहणारा गुसाय हा मूळ इशान्य भारतातील आहे. त्याच्या विरोधात पोलीस तक्रार नोंद झाल्यानंतर आणखिन काही पिडिताने न्यायालयात धाव घेउन संशयिताच्या अटकपुर्व जामीन अर्जाला विरोध केला होता. हा विरोध करताना पिडितांनी आपल्यालाही या संशयिताने कशा प्रकारे गंडा घातला हे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले होते. फसवणुकीचा हा आकडा २ कोटी ७0 लाखांच्या घरात आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

 

थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या 

 

Web Title: Gulshan, who escaped after duped crores of rupees, finally surrendered to Goa police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.