आजीने डांबून ठेवल्याची आजोबांची पाेलिसांत तक्रार; चाकूच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 06:27 AM2021-01-28T06:27:04+5:302021-01-28T06:27:21+5:30

फ्लॅट विकायचा असल्याने मी घर सोडून जावे म्हणून पत्नी छळ करते. या वयात मी कुठे जाणार.

Grandfather's complaint in Paelis that grandmother kept him; Threatened to kill with a knife | आजीने डांबून ठेवल्याची आजोबांची पाेलिसांत तक्रार; चाकूच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी

आजीने डांबून ठेवल्याची आजोबांची पाेलिसांत तक्रार; चाकूच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी

Next

मुंबई : पत्नीने चाकूच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी देऊन घरात डांबून ठेवल्याचा आरोप करत ७८ वर्षीय आजोबांनी मलबार हिल पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, पाेलिसांनी ७१ वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा नोंदवला असून पाेलीस तपास सुरू आहे.

मलबार हिल परिसरात ७८ वर्षीय आजोबा ७१ वर्षीय पत्नीसोबत राहतात. त्यांना ३ मुले असून, एक मुलगा नाशिक, दुसरा कॅनडात, तर ५४ वर्षीय मुलगी दिल्लीत राहते. आजाेबांच्या तक्रारीनुसार, पत्नीने सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांच्या मदतीने खोट्या कागदपत्रांद्वारे फ्लॅट स्वतःच्या नावावर  केला. याबाबत आजाेबांनी मलबार हिल पोलिसांकडे तक्रार केली असून, त्याबाबत चौकशी सुरू आहे.

फ्लॅट विकायचा असल्याने मी घर सोडून जावे म्हणून पत्नी छळ करते. या वयात मी कुठे जाणार. मला दोनदा कोरोना झाला होता. अँँजिओप्लास्टीही झाल्याचे आजाेबांनी सांगितले. २४ जानेवारीला सकाळी ७ ते ७.३०च्या  सुमारास पत्नीने भाजी कापण्याचा चाकू अंगावर राेखून घर सोडून न गेल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आजाेबांचा आराेप आहे. मोलकरणीने तिच्याकडील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, ती तिच्या अंगावर धावून गेली. मी घाबरून बेडरूममध्ये गेलो. तिने बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. मी दरवाजा ठोठावला; परंतु तिने ताे उघडला नाही. त्यानंतर काेणीतरी दरवाजा उघडल्याने मी बाहेर आलो, असे आजाेबांच्या तक्रारीत नमूद आहे.

Web Title: Grandfather's complaint in Paelis that grandmother kept him; Threatened to kill with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस