‘गुडविन’ घोटाळ्याच्या तपासाचे राज्यस्तरीय केंद्र ठाण्यातच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:36 AM2019-12-18T05:36:38+5:302019-12-18T05:37:00+5:30

पोलीस महासंचालकांचे आदेश : मंगळवारी आखली व्यूहरचना

The 'Goodwin' scam is being investigated at a state-level center in thane | ‘गुडविन’ घोटाळ्याच्या तपासाचे राज्यस्तरीय केंद्र ठाण्यातच

‘गुडविन’ घोटाळ्याच्या तपासाचे राज्यस्तरीय केंद्र ठाण्यातच

Next

जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘गुडविन ज्वेलर्स’ने राज्यभर केलेल्या करोडो रुपयांच्या फसवणूकीचा तपास एकमार्गी होण्यासाठी तसेच तपासाला योग्य दिशा येण्यासाठी या फसवणुकीच्या तपासाचे केंद्र हे ठाण्यात ठेवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत तपासाची व्युहरचना आखल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुडविन ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक तसेच या फसवणुकीतील मुख्य सूत्रधार तथा आरोपी सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोन्ही बंधूंनी ठाणे न्यायालयात शरणागती पत्करली आहे. त्यांची सध्या त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. अकराकरण यांचेच आणखी चार ते पाच साथीदार पसार आहेत. ठाणे शहराव्यतिरिक्त राज्यातील ठाणे ग्रामीणमधील नयानगर, पुणे, पिंपरी चिंचवड, चेंबुर, वाशी, पालघर आणि वसई आदी ठिकाणीही गुडविन ज्वेलर्सने अनेकांची फसवणूक केली आहे. केरळ राज्यात जाऊन सर्व बाजूंनी ठाणे पोलिसांनी अकराकरण बंधूंची आर्थिककोंडी केल्याने तसेच परदेशात जाण्याचे मार्गही बंद केल्याने त्यांनी शरणागती पत्करली. त्यांच्या पसार झालेल्या इतर चार आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने तसेच राज्यभरातील इतर ठिकाणच्या तपास अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन मिळण्यासाठी तसेच आरोपींकडून मिळणाºया माहितीची खातरजमा करण्यासाठी सर्वच ठिकाणच्या तपास अधिकाºयांची एकत्रित बैठक १७ डिसेंबर रोजी ठाण्यात पार पडली. या बैठकीला ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, पालघर आणि चेंबूर येथील पोलीस अधिकारी उपस्थित होते.आतापर्यंत किती गुंतवणूकदारांची किती रुपयांची फसवणूक झाली, याची माहिती यातून घेण्यात आली.

२६ मालमत्ता केल्या सील
ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींची केरळ, हैद्राबाद तसेच ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथील अशा २६ मालमत्ता सील केल्या आहेत. तसेच नऊ बँक खाती गोठविली आहेत. त्यातून कोणत्या बँक खात्यातून कोणत्या जिल्ह्यांतील दुकानातून पैसे वळविण्यात आले, याचा तपशीलही ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील दुकानांमधून जप्त केलेल्या संगणकातील हार्डडिस्कच्या सखोल तपासणीतून करण्यात येत आहे. त्यासाठी या हार्डडिस्कची मुंबईच्या मुख्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून तपासणी करण्यात येणार आहे. तपासातून कोणत्या बाबी तपासल्या जाव्यात, कोणत्या बाबींमुळे तपासाला योग्य दिशा मिळू शकेल तसेच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी आरोपींनी आणखी कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे? याची माहिती घेण्यासाठी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी राज्यातील इतर तपास अधिकाºयांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार मार्गदर्शन केले. यापुढेही हे सर्व अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतील.
तपासासाठी पाच पथके
च्तपासाच्या दृष्टीने ते एकमेकांना मिळालेल्या माहितीचे आदान प्रदान करतील, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले. ठाण्यात पाच पथकांची या एकाच तपासासाठी निर्मिती करण्यात आली असून ही पाच पथके राज्यातील इतर तपास अधिकाºयांंनाही मदत करतील, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
च्गुडवीन ज्वेलर्सने केलेल्या फसवणुकीसंबंधी एकाच प्रकारचे गुन्हे वेगवेगळया जिल्हयांमध्ये दाखल असल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या तपास अधिकाºयांना तपासाची दिशा देण्यासाठी मार्गदर्शन केल्याच्या वृत्ताला उपायुक्त जाधव यांनी दुजोरा दिला. मात्र, तपासातील गोपनियता राहण्याच्या दृष्टीने या बैठकीतील तपशील देण्यास मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली.

Web Title: The 'Goodwin' scam is being investigated at a state-level center in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.