गुडविन ज्वेलर्स प्रकरण : दोन भावांविरोधात लूकआउट नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 01:50 PM2019-10-29T13:50:42+5:302019-10-29T13:52:49+5:30

६९ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

Goodwin Jwellers Case: Lookout notice issued against two brothers | गुडविन ज्वेलर्स प्रकरण : दोन भावांविरोधात लूकआउट नोटीस जारी

गुडविन ज्वेलर्स प्रकरण : दोन भावांविरोधात लूकआउट नोटीस जारी

Next
ठळक मुद्देसुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोन दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.अंबरनाथमध्ये ४०० ते ५०० ग्राहकांचे  गुडविन ज्वेलर्सच्या भिशीत अडकलेअंबरनाथमध्ये ४५ ग्राहकांच्या तक्रारीवरून गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात 2 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

डोंबिवली - गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी आतापर्यंत ६९ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
जादा व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी या गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ३ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. तपासकामी एक पोलीस पथकही गठित करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात गुडविन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गुंतवणूक केल्यास १६ टक्के व्याजदर मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी लाखोंची गुंतवणूक केली होती. मात्र, दिवाळीच्या तोंडावर ज्वेलर्सचे दुकान बंद राहील्याने चर्चेला तोंड फुटले. आणि, समाज माध्यमांवरही ज्वेलर्सचा मालक आपले सामान घेऊन पसार झाल्याचा संदेश फिरण्यास सुरुवात झाली. दोन दिवस वाट पाहूनही दुकान उघडण्यात आले नसल्याने अखेर गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सदरचा तक्रार अर्ज दाखल होताच पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे दुकान सील करीत सुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोन दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथमध्ये गुडविन ज्वेलर्सचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात ग्राहकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथमधील गुडविन ज्वेलर्स दुकानात मासिक भिशीच्या नावावर अनेक ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये ४५ ग्राहकांच्या तक्रारीवरून गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात 2 कोटी 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये ४०० ते ५०० ग्राहकांचे  गुडविन ज्वेलर्सच्या भिशीत अडकले असून त्यांच्या तक्रारी आल्यावर त्याची देखील नोंद घेतली जाईल असे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे.

Web Title: Goodwin Jwellers Case: Lookout notice issued against two brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.