३ लाख २७ हजार २०० रुपयाचा माल  जप्‍त : तीन चोरटे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 09:53 PM2021-06-02T21:53:07+5:302021-06-02T21:54:25+5:30

Crime News :आर्वीतील पाच चोरट्यास अटक

Goods worth Rs 3 lakh 27 thousand 200 seized: Three thieves arrested | ३ लाख २७ हजार २०० रुपयाचा माल  जप्‍त : तीन चोरटे गजाआड

३ लाख २७ हजार २०० रुपयाचा माल  जप्‍त : तीन चोरटे गजाआड

Next
ठळक मुद्दे आर्वी तालुक्यातील पाचेगाव ते दहेगाव मार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी शेतकरी सहकारी यंत्रमाग औद्योगिक संस्था आहे.

देउरवाडा /आर्वी (वर्धा) : आर्वी पोलिसांनी पावर प्रकल्पातून चोरी गेलेल्या ४७ मोटारी आणि इतर  दोन मोटरसायकल एक मेटाडोर असा ३ लाख २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई बुधवारी करण्यात आली

आर्वी तालुक्यातील पाचेगाव ते दहेगाव मार्गावर राष्ट्रसंत तुकडोजी शेतकरी सहकारी यंत्रमाग औद्योगिक संस्था आहे. मात्र हा पावरलुम प्रकल्प बंद आहे. यात वर्कशेड मधील ४८ इलेक्ट्रीक मोटारी असून त्यापैकी ४७ मोटारी खिडकी तोडून चोरट्यांनी लंपास केल्या होत्या . या घटनेची तक्रार रामकृष्ण तांबेकर  रा. भाईपुर यांनी २४ फेब्रुवारीला दिली असता पोलिसांनी  गुन्हा नोंद करून पोलिसांनी  तपास चक्रे फिरविली होती.

 पोलिसांच्या मुखबिरच्या गुप्त माहितीवरून शेख शाहरुख शेख रुउफ (१९) रा. महाराणा प्रताप वार्ड, धरमसिंग उर्फ शिवा रतनसिंग चव्हाण ( १९ ) रा. कन्या शाळेसमोर झोपडपट्टी, शेख समीर शेख नासीर( २७ ) रा. साईनगर, शेख अमीर शेख हनीफ (२७) रा. बालाजी वॉर्ड ,मोहम्मद एफाज मोहमद एजाज (१९ ) रा. विठ्ठल वॉर्ड यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मालाची विचारपूस केली असता त्यांनी चोरी केलेल्या एकूण ४७ इलेक्ट्रिक मोटर किंमत एक लाख ४१ हजारचा माल चोरी केल्याचे कबूल केले 

या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या माला पैकी तांब्याची तार ७० किलो किंमत ७० हजार २००  नगदी १६९०० असा गुन्ह्यातील ८७ हजार १०० रुपयाचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेले तीन वाहनांची व इतर साहित्याची किंमत २ लाख ४ हजार १०० रुपये असा एकूण जुमला  किंमत ३ लाख २७ हजार दोनशे रुपयांचा माल जप्त केला.

Web Title: Goods worth Rs 3 lakh 27 thousand 200 seized: Three thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.