सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, गणेशोत्सवाच्या धामधुमीत रविवार पेठेत भरदुपारी घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:11 PM2021-09-18T23:11:36+5:302021-09-18T23:12:05+5:30

Crime News: गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाच्या बॅगमधून तब्बल १ कोटी २० कोटी रुपयाचे ३ किलो ३१९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले.

Gold jewelery worth Rs 1.25 crore stolen | सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, गणेशोत्सवाच्या धामधुमीत रविवार पेठेत भरदुपारी घडला प्रकार

सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, गणेशोत्सवाच्या धामधुमीत रविवार पेठेत भरदुपारी घडला प्रकार

googlenewsNext

पुणे - शहरात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना मुंबईहून पुण्यात दागिने विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाच्या बॅगमधून तब्बल १ कोटी २० कोटी रुपयाचे ३ किलो ३१९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी व्यावसायिकाने दोन महिला व एका लहान मुलावर संशय व्यक्त केला आहे.
याबाबत जिगेश नरेशकुमार बोराणा (वय ३३, रा. घाटकोपर, पश्चिम, मुंबई) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बोराणा हे त्यांचे मित्र मुकेश चौधरी यांच्यासह दागिने घेऊन पुण्यात आले होते. ते शहरातील विविध ज्वेलर्संना दागिने पुरवितात. त्यांच्याकडे एकूण ६ प्लॉस्टिक बॉक्समध्ये ६ किलो ९९ ग्रॅम वजनाचे दागिने होते. (Gold jewelery worth Rs 1.25 crore stolen)

 रविवार पेठेतील राजमल माणिकचंद ज्वेलर्स येथे ते दागिने दाखविण्यासाठी आले होते. दुकानातील आतील रुममध्ये त्यांनी दुकानातील मुकेश कुंवर या सेल्समनला सोन्याचा माल दाखविला. त्यातील एक मंगळसुत्राचे डिझाईन पसंद करुन त्यांनी कश काऊंटरवर ऑर्डर देण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी कॅश काऊंटरजवळ येऊन दुकानाचे मालक पन्हालाल छाजेड यांना मंगळसुत्र दाखविण्यासाठी बोराणा यांनी त्यांच्याकडील सॅकमधून फक्त मंगळसुत्र काढून दाखविले. त्यानंतर त्यांनी ते मंगळसुत्र पुन्हा सॅकमध्ये ठेवले. ते छाजेड यांच्याशी बोलत असताना त्यांच्या शेजारी एक महिला येऊन थांबली होती.

तिच्यामागे दुसरी महिला व एक लहान मुलगा होता. शेजारी उभ्या असलेल्या महिलेने तोंडाला बांधलेला स्कॉर्फ सॅकवर टाकला. स्कॉर्फ घेताना तिने वरच्या बाजूला ठेवलेला सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरुन नेला. हा प्रकार लक्षात आल्यावर बोराणा यांनी बाहेर येऊन त्या महिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या गर्दीत दिसेनाशा झाल्या.त्या बॉक्समध्ये १ कोटी २० लाख रुपयांचे ३ किलो ३१९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने होते. फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Gold jewelery worth Rs 1.25 crore stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.