Gold hidden under a chair, a passenger from Delhi was taken into custody | खुर्चीखाली लपवून आणलं सोनं, दिल्लीहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात 

खुर्चीखाली लपवून आणलं सोनं, दिल्लीहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात 

ठळक मुद्देयाप्रकरणात कस्टम कायद्याखाली तस्करीचे सोने जप्त करण्यात आलेले असून त्या प्रवाशाला अटक केल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. कस्टम अधिकारी याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावर नवी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाला कस्टम विभागाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ कीलो १७० ग्राम तस्करीचे सोने जप्त केले. हे विमान प्रथम दुबईहून दिल्लीला येत असताना एका प्रवाशाने तस्करीचे सोने विमानातील प्रवासी खुर्ची खाली लपवून ठेवले होते. विमान दिल्लीतून गोव्यासाठी येण्याकरिता निघण्यापूर्वी तस्करी करणाऱ्या या गटाचा दुसरा साथिदार विमानात चढून तो हे सोने गोव्यात आणण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दाबोळीवरील जागृत कस्टम अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे त्याचा हा बेत फसला.


दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार शनिवारी (दि.२३) ही कारवाई करण्यात आली. दिल्लीहून दाबोळीवर येणाऱ्या विमानातून प्रवासी तस्करीचे सोने आणणार असल्याची माहीती कस्टम अधिकाऱ्यांना पूर्वीच प्राप्त झाली होती. यामुळे त्यांनी येथील सर्व हालचालीवर कडक नजर ठेवली होती. दिल्लीहून आलेल्या विस्तारा (युके ८४७) विमानातील एका प्रवाशावर कस्टम अधिका ऱ्यां ना दाट संशय निर्माण झाला. त्याची येथे कसून तपासणी केली असता त्याच्याकडून विदेशी सोन्याच्या बिस्कीट आढळल्या. त्या प्रवाशाकडून अधिकाºयांनी जप्त केलेल्या सोन्याचे वजन २ कीलो १७० ग्राम असून याची किंमत ९५ लाख ३ हजार रुपये असल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. तस्करीच्या सोन्यासहीत सापडलेल्या याप्रवाशाशी अधिकाºयांनी कसून चौकशी केली असता तो मूळ पच्छीम बंगाल चा असल्याचे स्पष्ट झाले. दाबोळीवर उतरण्यापूर्वी हे विमान दुबईहून दिल्लीला आले असता त्यात प्रवास करणाºया एका प्रवाशाने तस्करीचे सोने विमानातील एका खुर्चीखाली लपवून ठेवल्याची माहीती अधिकाऱ्यांना तपासणीवेळी प्राप्त झाली. नंतर ताब्यात घेण्यात आलेला हा प्रवासी दिल्लीत त्या विमानात चढून विमान दाबोळीवर उतरल्यानंतर तो हे तस्करीचे सोने बाहेर काढून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र येथे झालेल्या कारवाईमुळे त्याचा बेत फसला. याप्रकरणात कस्टम कायद्याखाली तस्करीचे सोने जप्त करण्यात आलेले असून त्या प्रवाशाला अटक केल्याची माहीती कस्टम सूत्रांनी दिली. कस्टम अधिकारी याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत.९ महिन्यात दाबोळीवर जप्त केले १ कोटी ११ लाख रुपयांचे तस्करीचे सोने
दाबोळी विमानतळावर एप्रिल २०२० ते आत्तापर्यंत कस्टम अधिकाऱ्यांनी कारवाई करून १ कोटी ११ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केल्याची माहीती कस्टम सूत्रांकडून प्राप्त झाली. याकाळात कारवाई करून जप्त केलेल्या तस्करीच्या सोन्याचे एकूण वजन २ कीलो ५१५ ग्राम असल्याची माहीती त्यांनी दिली.  

Web Title: Gold hidden under a chair, a passenger from Delhi was taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.