ओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन‌् झाली फसवणूक  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 08:40 PM2020-11-09T20:40:29+5:302020-11-09T20:41:08+5:30

Crime News : याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Going to sell bicycles on OLX was a fraud | ओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन‌् झाली फसवणूक  

ओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन‌् झाली फसवणूक  

googlenewsNext
ठळक मुद्देसुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची सायकल खरेदी केली होती.

जऴगाव  : ओएलएक्स या ऑनलाईन साईडच्या माध्यमातून सायकल विक्री करण्याच्या नादात सूरज महेंद्र पाटील (वय २१, रा.भूषण कॉलनी) या तरुणाला २८ हजारात गंडविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.


सुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची सायकल खरेदी केली होती. ही सायकल विक्री करायची असल्याने त्याने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ओएलएक्स या साइटवर सायकलचे छायाचित्र अपलोड करुन जाहिरात टाकली. जाहिरात टाकताच सूरजला राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्याने माझे ठाणे, मुंबईला दुकाने आहेत, याप्रमाणे गप्पा मारत सायकल खरेदी करायचे असून तुम्हाला पाठवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा त्यानंतर तुम्हाला संबंधित सायकलची रक्कम मिळेल असे सांगितले.

सूरजने गुगल पे च्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करताच त्याच्या बँकेच्या खात्यावरुन अर्ध्या तासाच्या अंतरात दोन वेळा तीन हजार व दोन वेळा ११ हजार असे एकूण २८ हजार रुपये काढण्यात आल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले. हे पैसे हे सपना राणी नामक महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचेही सूरजला गुगलपेच्या माध्यमातून कळले. पैसे परत करण्याच्या बहाण्याने सूरजला संबंधितांचे फोन येत आहेत. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सूरजने त्याच्या मित्रासह तक्रारीसाठी रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले आहे. यानंतर त्याला सायबर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. तेथून पुन्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार द्या असे सांगण्यात आले. या फिरवाफिरवमध्ये अखेर रामानंदनगर पोलिसांनी तक्रार घेतली. 

Web Title: Going to sell bicycles on OLX was a fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.