धक्कादायक! मुलीने एक दिवसआधी केली होती मृत्यूची भविष्यवाणी, सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 11:08 AM2021-02-20T11:08:10+5:302021-02-20T11:24:13+5:30

Girl Predicted Own Death On Facebook: क्रिश्चन गुमेरससने तिच्या हत्येच्या (Murder) एक दिवस आधी फेसबुकवर लिहिले होते की, 'मी इथे तुम्हाला गुडबाय करायला आले आहे. मी लवकरच मरणार आहे'.

Girl predicted own death on Facebook post about the location of her dead body | धक्कादायक! मुलीने एक दिवसआधी केली होती मृत्यूची भविष्यवाणी, सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह....

धक्कादायक! मुलीने एक दिवसआधी केली होती मृत्यूची भविष्यवाणी, सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह....

googlenewsNext

Girl Predicted Own Death On Facebook: ब्राझीलमधून(Brazil) हत्येची(Murder) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने तिच्या हत्येची भविष्यवाणी फेसबुकवर केली होती आणि दुसऱ्या दिवशी तिची हत्या करण्यात आली. फेसबुक पोस्टमध्ये(Facebook Post) तरूणीने सांगितले होते की, तिचा मृतदेह कुठे सापडेल. पोलिसांनी त्याच ठिकाणाहून तिचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण....

१७ वर्षीय अल्पवयीन तरूणी क्रिश्चन गुमेरसची हत्या ब्राझीलच्या अमेजोनसमध्ये करण्यात आली. क्रिश्चन गुमेरससने तिच्या हत्येच्या एक दिवस आधी फेसबुकवर लिहिले होते की, 'मी इथे तुम्हाला गुडबाय करायला आले आहे. मी लवकरच मरणार आहे'.

क्रिश्चन गुमेरसने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, तिने एका ड्रग डीलरकडून जवळपास ४०,४३७ रूपये कर्ज घेतलं होतं. ते ती फेडू शकत नव्हती. क्रिश्चन म्हणाली की, कर्जाच्या नादात तिचा मर्डर होणार आहे. त्यासोबतच क्रिश्चनने हेही लिहिले होते की, मर्डरनंतर तिचा मृतदेह कुठे सापडेल.

हत्येनंतर तिच्या प्रोफाइलवरून पोस्ट

पीडितेच्या हत्येच्या एक दिवसानंतर क्रिश्चन गुमेरसच्या फेसबुक प्रोफाइलवरून आणखी एक पोस्ट करण्यात आली. ज्यात क्रिश्चनची डेडबॉडी कुठे आहे याबाबत सांगितले आहे. असे मानले जात आहे की, ही पोस्ट मारेकऱ्यांना पीडितेच्या प्रोफाइलवरून केली आहे. त्यांनी लिहिले की, या घटनेला कमांडो वरमेल्हो नावाची गॅंग जबाबदार आहे.

भविष्यवाणी झाली खरी

पोलिसांनुसार, त्यांना क्रिश्चन बेपत्ता झाल्याची माहिती १२ फेब्रुवारीला मिळाली होती. पण ते तिथे पोहोचेपर्यंत तिची हत्या झाली होती. जसे की, क्रिश्चनने फेसबुक पोस्टमधून सांगितले होते की, तिची हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी १३ फेब्रुवारीला तिच्यावर गोळी झाडली.

मिररच्या वृत्तानुसार, पोलिसांचं मत आहे की, कमांडो वरमेल्हो गॅंगचा किश्चन गुमरेसच्या हत्येसोबत काहीही संबंध नाही. मारेकऱ्यांनी पोलिसांनी भरकटवण्यासाठी या गॅंगवर आरोप लावला आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. लवकरच आरोपींना पकडले जाईल.
 

Web Title: Girl predicted own death on Facebook post about the location of her dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.