चिमुकलीने करून घेतली अपहरणकर्त्या युवकाच्या तावडीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:09 PM2020-10-20T17:09:50+5:302020-10-20T17:17:14+5:30

Girl managed to escapes from the kidnappers कृषी नगर परिसरात चिमुकलीने युवकाच्या तावडीतून सुटका करून घेतली.

Girl managed to escapes from the kidnappers in Akola | चिमुकलीने करून घेतली अपहरणकर्त्या युवकाच्या तावडीतून सुटका

चिमुकलीने करून घेतली अपहरणकर्त्या युवकाच्या तावडीतून सुटका

Next
ठळक मुद्देतीची हरविलेली सायकल दाखविण्याचे आमीष देउन पळविण्याचा प्रयत्न.कृषी नगर परिसरात चिमुकलीने युवकाच्या तावडीतून सुटका करून घेतली.

 आरोपीचे रेखाचीत्र जारी, दुचाकीस्वार युवकाविरुध्द गुन्हा

अकोला : सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नगरातील रहिवासी असलेल्या १३ वर्षीय चिमुकलीला तीची हरविलेली सायकल दाखविण्याचे आमीष देउन पळविण्याचा प्रयत्न करणाºया अज्ञात दुचाकीचालकाविरोधात सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकलीने अपहरणकर्त्या युवकाच्या तावडीतून सुटका चिमुकलीची सुटका करून घेतली.  या मुलीला पळविणाºया आरोपीचे रेखाचीत्र पोलिसांनी जारी केले असून त्याच शोध सुरु करण्यात आला आहे.

सिव्हील लाईन्सच्या हद्दीतील एक सहाव्या वर्गात शिकवणारी १३ वर्षीय मुलगी तीच्या मैत्रीनीसोबत खेळत असताना त्या ठिकाणी दुचाकीवर एक युवक आला. त्यानंतर चिमुकलीशी गोष्टी केल्यानंतर मुलीची हरविलेली सायकल परत देण्याचे सांगत तीला दुचाकीवर बसवीले. त्यानंतर या मुलीला दुचाकीने पळवून नेत असतानाच पीकेव्हीनजीक कृषी नगर परिसरात चिमुकलीने युवकाच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मुलीला सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी पोलिसांनी तीची विचारपुस केल्यानंतर मुलगी खेळत असलेल्या ठिकाणावर पाहणी सुरु केली. या दरम्यान मुलीला पळविणारा सदर युवक सीसीटीव्ही क ॅमेºयात कैद झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Girl managed to escapes from the kidnappers in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.