गॅस सिलेंडर चोरट्यास अटक, तब्बल ११५ सिलेंडर अन् एक टॅम्पो जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 03:11 PM2021-07-10T15:11:32+5:302021-07-10T15:12:08+5:30

चार गुन्हे उघड : चोरीच्या टेम्पोसह ११५ सिलेंडर जप्त

Gas cylinder thief arrested, 115 cylinders and a tampo seized by police in navi mumbai | गॅस सिलेंडर चोरट्यास अटक, तब्बल ११५ सिलेंडर अन् एक टॅम्पो जप्त

गॅस सिलेंडर चोरट्यास अटक, तब्बल ११५ सिलेंडर अन् एक टॅम्पो जप्त

Next
ठळक मुद्देजुईनगर रेल्वे स्थानक आवारातील उभ्या टेम्पो मधून गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची घटना ५ जुलैला घडली होती. त्याच परिसरात यापूर्वी देखील टेम्पोसह गॅस सिलेंडर चोरीला गेले होते.

नवी मुंबई : घरगुती अथवा व्यावसायिक वापराचे सिलेंडर चोरणाऱ्या एकाला नेरुळ पोलीसांनी अटक केली आहे. नवी मुंबईतूनचोरलेल्या सिलेंडरची तो पनवेल परिसरात विक्री करत होता. त्यानुसार त्याच्याकडून सिलेंडर चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील एक टेम्पो व ११५ सिलेंडर जप्त करण्यात आले  आहेत.

जुईनगर रेल्वे स्थानक आवारातील उभ्या टेम्पो मधून गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची घटना ५ जुलैला घडली होती. त्याच परिसरात यापूर्वी देखील टेम्पोसह गॅस सिलेंडर चोरीला गेले होते. त्यामुळे गुन्हा दाखल होताच नेरुळ पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही अथवा तांत्रिक तपासावर भर दिला होता. यासाठी उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वरिष्ठ निरीक्षक शाम शिंदे यांनी निरीक्षक सुनील गवळी, सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, सचिन मोरे आदींचे पथक केले होते. त्यांनी केलेल्या कसून तपासात एका संशयीत टेम्पोची माहिती मिळाली होती. त्याद्वारे बुधवारी पनवेलच्या तक्का परिसरातून श्रीराम गोपीलाल बिष्णोई (२३) याला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्याने केलेल्या चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात नेरुळ परिसरातील ३ व एपीएमसी परिसरातील एका गुन्ह्याचा समावेश आहे. यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. तर त्याने यापूर्वी चोरलेला एक टेम्पो व ११५ गॅस सिलेंडर असा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

श्रीराम याने यापूर्वी गॅस एजन्सी मध्ये काम केले आहे. त्यानुसार रात्रीच्या वेळी सिलेंडरने भरलेले टेम्पो कुठे उभे असतात याची त्याला माहिती होती. तर चोरलेले सिलेंडर तो पनवेलच्या ग्रामीण भागात ३ हजार रुपयांना विकत होता. ज्या ग्राहकांना जोड सिलेंडरची गरज असेल त्यांना तो या सिलेंडरची विक्री करायचा. 

Web Title: Gas cylinder thief arrested, 115 cylinders and a tampo seized by police in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.