खोलीची साफसफाई करण्यास बोलावून महिलेवर केला गँगरेप; हॉटेलचा कर्मचारी देखील सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 02:10 PM2021-10-16T14:10:58+5:302021-10-16T14:11:57+5:30

Gangrape Case : आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

Gangrape a woman by calling her to clean the room; Hotel staff also joined | खोलीची साफसफाई करण्यास बोलावून महिलेवर केला गँगरेप; हॉटेलचा कर्मचारी देखील सामील

खोलीची साफसफाई करण्यास बोलावून महिलेवर केला गँगरेप; हॉटेलचा कर्मचारी देखील सामील

googlenewsNext
ठळक मुद्देपिवळा शर्ट घातलेला एक माणूस तिला स्वच्छतेसाठी हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. या कामाच्या बदल्यात त्याने तिला एक हजार रुपये देण्याबाबतही चर्चा केली.

राजस्थानचे टेक्सटाईल सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीलवाडा येथील एका हॉटेलमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने पैशांच्या देवाणघेवाणबाबत बोलून स्वच्छतेच्या नावाखाली महिलेला खोलीत बोलावले. त्यानंतर, तेथे आधीच उपस्थित असलेल्या इतर लोकांसह, तिला दारू पिण्यास लावली आणि नंतर ६ लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींमध्ये हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, पिवळा शर्ट घातलेला एक माणूस तिला स्वच्छतेसाठी हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला. या कामाच्या बदल्यात त्याने तिला एक हजार रुपये देण्याबाबतही चर्चा केली. जेव्हा ती महिला त्याच्यासोबत खोलीत पोहचली तेव्हा तेथे तीन पुरुष आधीच दारू पिऊन बसले होते. महिला सुद्धा तिथे जाऊन बसली. मग या चौघांनी दारू प्यायला सुरुवात केली आणि महिलेलाही दारू प्यायला लावले. त्यानंतर त्यांनी महिलेवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.

चौघांना जबरदस्ती केल्यानंतर त्यांनी हॉटेलवाल्याला बोलावले आणि सांगितले की, तो हॉटेलचा मालक आहे आणि त्या माणसाने महिलेवर जबरदस्ती केली. दुसऱ्या एका माणसाने तिला ओढून नेले आणि तिला समोरासमोरील खोल्यांमध्ये नेऊन जबरदस्ती अत्याचार करत राहिले आणि तिला खोलीबाहेरून कुलूप लावून बंद केले. तेथून सुटका करून घेतल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.

भीलवाडा पोलीस उपअधीक्षक (सदर) रामचंद्र यांनी सांगितले की, २८ वर्षीय महिला बाबा धामजवळ मजुरीचे काम करते. तिने आरोप केला की, काल संध्याकाळी एक व्यक्ती तिच्याकडे येते आणि तिला हॉटेल अमित पॅलेसमधील खोली स्वच्छ करण्यासाठी मजुरीवर घेऊन जाते. महिलेचा आरोप आहे की, जेव्हा ती खोलीत जाते तेव्हा मद्यपान केलेले तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात करतात. या नराधमांमध्ये ५ ते ६ मुलं आहेत. त्यांच्यामध्ये हॉटेलचा एक कर्मचारी आहे. ती त्याचे नाव सांगत आहे. बाकीची नावे माहित नाहीत.

डीएसपीच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या वक्तव्याच्या आधारे सुभाष नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आता संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. खात्री पटल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी केवळ महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन केले जात आहे. आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही.

Web Title: Gangrape a woman by calling her to clean the room; Hotel staff also joined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.