रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरात रात्रीच्या वेळेस प्रवाशांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 09:07 PM2020-02-25T21:07:12+5:302020-02-25T21:14:35+5:30

महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई

A gang of six men looted passengers at night at the train station and ST stand area. | रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरात रात्रीच्या वेळेस प्रवाशांना लुटणारी सहा जणांची टोळी गजाआड

फोटो प्रातिनिधीक आहे.

googlenewsNext

कल्याण : रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरात रात्रीच्या वेळेस प्रवाशाना लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी  गजाआड केले आहे.

आज पहाटेच्या सुमारास महात्मा फुले चौक पोलिसांचे पथक कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना सहा तरुण संशयास्पदरीत्या आढळून आले. या सहा जणांवर संशय बळावल्याने त्यांनी या तरुणांना हटकले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्र आढळले. पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान प्रवाशांना  लुबाडण्यास आल्याचे सर्वांनी सांगितले. 
समाधान मोरे (45), निलेश शेलार (19), काल्या सांवत ( 25), गोकुळ सोनवणे (26) ,सम्राट शिंदे (25), नदीम पठाण (30) अशी या सहा लुटारुंची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या सहा जणांकडून  पोलिसांनी धारदार शस्त्र, लुटमार करण्यासाठी वापरण्यात आलेली एक रिक्षा आणि दुचाकी जप्त केली.

 या टोळीने किती लोकांना लुटले आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: A gang of six men looted passengers at night at the train station and ST stand area.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण