सामूहिक बलात्कारप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 07:32 AM2020-10-23T07:32:16+5:302020-10-23T07:33:25+5:30

१ जानेवारी २०१५ रोजी सहा ते रात्री दोन वाजेदरम्यान हा गुन्हा घडला होता. पाचेगाव येथून बीडला जाण्यासाठी पीडित महिलेला जीपमध्ये बसवून चौघांनी एरंडगाव येथील गायरानात नेऊन सामूहिक बलात्कार केला.

Gang rape Life imprisonment for four | सामूहिक बलात्कारप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा

सामूहिक बलात्कारप्रकरणी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

बीड : गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे पाच वर्षांपूर्वी विवाहित महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय हेमंत महाजन यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

१ जानेवारी २०१५ रोजी सहा ते रात्री दोन वाजेदरम्यान हा गुन्हा घडला होता. पाचेगाव येथून बीडला जाण्यासाठी पीडित महिलेला जीपमध्ये बसवून चौघांनी एरंडगाव येथील गायरानात नेऊन सामूहिक बलात्कार केला. २ जानेवारी रोजी तिने जिजा लालसिंग राठोड, अमोल मदन काष्टे, कुंडलिक बन्सी राठोड आणि नवनाथ बाबूराव जाधव चौघांविरुद्ध तक्रार दिली. पीडित महिला, तिचा पती, वैद्यकीय अधिकारी, ओळखपरेड घेणारे नायब तहसीलदार, गुन्हा नोंदविणारे एपीआय तळेकर, तपासी अधिकारी उपाध्यक्ष गौरव सिंग यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या.
 

Web Title: Gang rape Life imprisonment for four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.