फरार विजय मल्ल्या याला १८ जानेवारी रोजी शिक्षा? आरोपीची वाट पाहू शकत नाही, कोर्टाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 09:52 AM2021-12-01T09:52:54+5:302021-12-01T09:53:25+5:30

Vijay Mallya News: किंगफिशर एअरलाइन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या प्रकरणात स्वत:च्या संपूर्ण मालमत्तेची माहिती सादर न करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल विजय मल्ल्या याच्याविरोधात १८ जानेवारी रोजी निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.

Fugitive Vijay Mallya sentenced on January 18? Can't wait for the accused, court opinion | फरार विजय मल्ल्या याला १८ जानेवारी रोजी शिक्षा? आरोपीची वाट पाहू शकत नाही, कोर्टाचे मत

फरार विजय मल्ल्या याला १८ जानेवारी रोजी शिक्षा? आरोपीची वाट पाहू शकत नाही, कोर्टाचे मत

googlenewsNext

नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या प्रकरणात स्वत:च्या संपूर्ण मालमत्तेची माहिती सादर न करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल विजय मल्ल्या याच्याविरोधात १८ जानेवारी रोजी निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाने स्वत:हून मल्ल्याविरुद्ध अवमान प्रकरण दाखल करून घेतले होते.   न्या. उदय लळित यांनीच मंगळवारी ही माहिती देताना सांगितले की, आम्ही विजय मल्ल्या याला त्याची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. पण तो न्यायालयात हजर झाला नाही. आम्ही आणखी त्याची वाट पाहू शकत नाही. या प्रकरणाचा निर्णय द्यायला हवा. आम्ही शिक्षेबाबतचे त्याचे म्हणणे त्याच्या वकिलांकडून ऐकू.  हे प्रकरण २०१७ सालचे असून, त्याआधीपासून विजय मल्ल्या फरार आहे. तो सध्या ब्रिटनमध्ये आहे.  आम्ही या प्रकरणात अवमानाबाबातच्या शिक्षेबाबतची अंतिम सुनावणी घेणार आहोत. त्याला प्रत्यार्पण कारवाईद्वारे हजर होता येईल. जर तो हजर झाला नाही, तर त्याचा वकील असेलच.

Web Title: Fugitive Vijay Mallya sentenced on January 18? Can't wait for the accused, court opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.