मैत्री, प्रेम आणि...; नगरला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला ‘क्लास वन’ अधिकारी, ३ कोटींच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 05:26 AM2021-05-19T05:26:13+5:302021-05-19T05:26:44+5:30

जखणगाव येथील बंगल्यात एकटीच राहणारी आरोपी महिला ही आधी श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसुखाचे आमिष दाखवायची

Friendship, love and ...; caught 'class one' officer in 'honey trap at Ahmadnagar | मैत्री, प्रेम आणि...; नगरला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला ‘क्लास वन’ अधिकारी, ३ कोटींच्या खंडणीची मागणी

मैत्री, प्रेम आणि...; नगरला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला ‘क्लास वन’ अधिकारी, ३ कोटींच्या खंडणीची मागणी

Next

अहमदनगर : नगर तालुक्यातील जखणगाव येथे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये नगर शहरात नोकरी करणारे एक ‘क्लास वन’ अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी सदर महिलेसह तिच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पीडित अधिकाऱ्यानेच फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह तिचे साथीदार सचिन खेसे, अमोल मोरे, महेश बागले व सागर खरमाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत खेसे याला अटक केली. आरोपी महिला व अमोल मोरे यांना पोलिसांनी आधीच दाखल झालेल्या गुन्ह्यात १५ मे रोजी अटक केलेली आहे.

जखणगाव येथील बंगल्यात एकटीच राहणारी आरोपी महिला ही आधी श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करायची. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीरसुखाचे आमिष दाखवायची. समोरचा व्यक्ती महिलेच्या आमिषाला बळी पडला की, या टोळीचे पुढील नियोजन ठरलेले असायचे. 

अधिकाऱ्याला वारंवार ब्लॅकमेल
आरोपी महिलेने सदर अधिकाऱ्यास १ मे रोजी दुपारी तिच्या जखणगाव येथील बंगल्यात बोलावून घेत शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. यावेळी तिच्या साथीदारांनी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करत या अधिकाऱ्यास ‘तीन कोटी रुपये आणून दे, नाहीतर हा व्हिडिओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन’, अशी धमकी दिली. यावेळी अधिकाऱ्याच्या वाहनात असलेले ३० हजार रुपये तसेच ऑनलाईन ५० हजार रुपये जबरदस्तीने घेण्यात आले. त्यानंतरही ही महिला या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून वारंवार ३ कोटी रुपये देण्याची मागणी करत होती.

सदर महिला व तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल असून या अनुषंगाने महत्त्वाचे पुरावे मिळालेले आहेत. अशा पद्धतीने आरोपींनी ज्यांच्याकडे खंडणी मागितली आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी.    - राजेंद्र सानप, तपास अधिकारी

तिच्या मोबाइलमध्ये ‘ते’ व्हिडीओ
श्रीमंतांना ब्लॅकमेल करण्यासाठी आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी तयार केलेले व्हिडिओ पोलिसांना आरोपींच्या मोबाइलमधून मिळाले आहेत. हनीट्रॅप प्रकरणात या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Friendship, love and ...; caught 'class one' officer in 'honey trap at Ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.