नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 12:20 AM2021-04-11T00:20:06+5:302021-04-11T00:20:24+5:30

crime news : दादा पाटीलवाडी येथील किरण सोसायटी येथे एक खोली भाड्याने घेऊन या न्यू वर्क रिक्रूटमेंट या नावाने प्लेसमेंटची कंपनी सुरू झाली होती.

Fraud of unemployed by showing job lure, crime in Naupada police station | नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

googlenewsNext

ठाणे : बँकेत तसेच मोठ्या कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुण-तरुणींकडून पैसे उकळणाऱ्या ठाण्यातील एका प्लेसमेंट कंपनीचे पितळ उघडे पडले आहे, या कंपनीने शेकडो बेरोजारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकलल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीच्या मालकांनी पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दादा पाटीलवाडी येथील किरण सोसायटी येथे एक खोली भाड्याने घेऊन या न्यू वर्क रिक्रूटमेंट या नावाने प्लेसमेंटची कंपनी सुरू झाली होती. सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या कंपनीने विविध वेबसाइटवर माहिती देऊन नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली होती. १९ वर्षीय तरुणीने एका जॉब साइटवर स्वत:ची माहिती आणि मोबाइल क्रमांक नोंदविला होता.
२५ मार्च २०२१ रोजी निशा जाधव यांना एका महिलेने फोन करून न्यू वर्क रिक्रूटमेंट या प्लेसमेंट येथून बोलत असल्याचे सांगून निशा यांना बायोडाटा घेऊन कार्यालयात बोलविले. बँकेत चार जागा भरायच्या असल्याचे सांगून तिथे पाठविण्यासाठी त्यांच्याकडून तीन हजार घेतले. त्यानंतर बँकेचा पत्ता फोनद्वारे देण्यात येईल, असे सांगितले. काही दिवस उलटूनही या रिक्रूटमेंटकडून काहीच फोन न आल्यामुळे निशा यांनी ठाण्याचे ते कार्यालय गाठले. तिथे अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे त्यांना आढळले. त्यांच्याकडूनही त्यांनी पैसे उकळून अशीच बतावणी केली. ही कंपनी फसवी असल्याचे समजताच काही तरुणांनी स्थानिक समाजसेवक तुषार रसाळ यांच्या मदतीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

२५ ते ३१ मार्चदरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला असून अशा अनेकांची यामध्ये १९ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर या कंपनीच्या संचालकाने पोबारा केला आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Fraud of unemployed by showing job lure, crime in Naupada police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.