राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकासह चौघे निलंबित, आयुक्तांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:29 AM2021-07-31T00:29:07+5:302021-07-31T00:29:43+5:30

state excise department : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या पथकाने १७ जुलै रोजी भुसावळ येथे छापा टाकून बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता.

Four suspended, including state excise department inspector, commissioner action | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकासह चौघे निलंबित, आयुक्तांची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकासह चौघे निलंबित, आयुक्तांची कारवाई

googlenewsNext

- सुनील पाटील

जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील भरारी पथकाने भुसावळ येथे बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करून ११ लाख ४६ हजार ७०० रुपयांची दारू पकडल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आय एन वाघ, दुय्यम निरीक्षक के. बी. मुळे, जवान एस.एस.निकम व एन.बी.पवार या चौघांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी रात्री हे आदेश जारी केले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या पथकाने १७ जुलै रोजी भुसावळ येथे छापा टाकून बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. दरम्यान याप्रकरणी अधीक्षक सीमा झावरे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. चाळीसगाव येथे देखील बाहेरच्या पथकाने ८४ लाखाची बनावट दारू पकडली होती. 

बाहेरच्या पथकाने दुसऱ्या जिल्ह्यात कारवाई केली तर त्या जिल्ह्याच्या अधीक्षकासह निरीक्षक व संबंधित कर्मचारी यांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिला होता. त्यानुसार पहिली व्हिकेट जळगाव जिल्ह्यात पडली आहे.

Web Title: Four suspended, including state excise department inspector, commissioner action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.