एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला फिरायला नेऊन, तिच्यावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना चेन्नईमधून समोर आली आहे. या घटनेमुळे प्रेमसंबंधांमधील वाढत्या हिंसेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. व्यासरपाडी येथील जेजे नगरमध्ये राहणाऱ्या सेलवेंद्रन यांची पत्नी प्रियंका ही गेल्या दोन वर्षांपासून सेलवेंद्रनपासून वेगळी राहत होती. याच दरम्यान नेटकुंद्रम भागातील गोविंदराज या ऑटोचालकाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही चेन्नईमध्येच एकत्र राहात होते.
गेल्या बुधवारी घरातून बाहेर गेलेली प्रियंका रविवारी पुन्हा घरी आली. त्यामुळे गोविंदराजला तिच्या चारित्र्यावर संशय आला आणि त्याने ती कुठे गेली होती, यावरून तिच्यासोबत जोरदार भांडण केले. रात्री पुन्हा दोघांमध्ये समेट झाल्यानंतर गोविंदराजने पिण्याचा बहाणा करून तिला मनाली परिसरातील एका कारखान्याच्या मागील मोकळ्या जागेत नेले. दारू पित असताना पुन्हा त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला.
राग अनावर झालेल्या गोविंदराजने काचेची बाटली फोडली आणि त्या तुटलेल्या बाटलीने प्रियंकाच्या गळ्यावर आणि पोटावर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला.
प्रियकराने स्वतःच दिली पोलिसांना माहिती
मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास गोविंदराज व्यासरपाडी पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने सांगितले की, "मी माझ्या प्रेयसीला जीवे मारले आहे."
घटनास्थळी पोहोचलेल्या व्यासरपाडी पोलिसांनी प्रियंकाला मृत अवस्थेत पाहिले. परंतु, घटनास्थळ मनाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी तातडीने मनाली पोलिसांना माहिती दिली. मनाली पोलिसांनी प्रियंकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी स्टॅनली रुग्णालयात पाठवला आहे. मनाली पोलिसांनी गोविंदराजला अटक केली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
Web Summary : In Chennai, an auto driver murdered his girlfriend after a heated argument. He took her to a secluded spot, attacked her with a broken glass bottle, and then confessed to the police. The police are investigating.
Web Summary : चेन्नई में एक ऑटो चालक ने बहस के बाद अपनी गर्लफ्रेंड की हत्या कर दी। उसे एकांत जगह पर ले गया, टूटी हुई कांच की बोतल से हमला किया, और फिर पुलिस के सामने कबूल किया। पुलिस जांच कर रही है।