खामगावात तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 08:50 PM2019-08-28T20:50:20+5:302019-08-28T20:52:19+5:30

चारित्र्यावर संशय घेत नवविवाहितेला पतीने दिला तलाक

First crime case registered in Khamgaon regarding triple talaq | खामगावात तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल

खामगावात तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम ४ व उपरोक्त सात जणाांविरुध्द सहकलम ४९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी शहरातील लक्कडगंज माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेने शहर पोस्टेला तक्रार दिली

खामगाव - तीन महिन्या अगोदर लग्न झालेल्या नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तलाक दिल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी खामगाव माहेर असलेल्या २० वर्षीय नवविवाहितेच्या तक्रारीवरुन पतीसह सासरच्या आठ जणाांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिहेरी तलाकचा हा खामगावातील पहिला गुन्हा आहे.
याप्रकरणी शहरातील लक्कडगंज माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेने शहर पोस्टेला तक्रार दिली की, तिचा ३ मार्च २०१९ रोजी शेख अतीक शे. बिसमिल्ला रा.पेठ मोहल्ला नांदुरा याचेशी विवाह झाला. विवाहानंतर त्याने दुचाकी आणि घरात सोफा आदी वस्तू खरेदी करण्यासाठी माहेरवरुन पैसे आणण्याचा तगादा लावून शारीरिक आणि मानसिक छळ केला. तर सासरा शेख बिसमिल्ला, सासू नसीमाबी शो.बिसमिल्ला, जेठ शे. शफिक शे.बिसमिल्ला, जेठाणी हिना परवीन शे.शकील, जेठाणी बबली शे.शफिक, नणंद उस्मानाबी अधिक एक सर्व रा.पेठ मोहल्ला नांदुरा यांनीही सदर विवाहितेला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देवून पैशाची मागणी केली तसेच पती शेख अतीक याने चारित्र्यावर संशय घेत तलाक दिला. या तक्रारीवरुन येथील शहर पोस्टेत पती शेख अतीक शे.बिसमिल्ला याचेविरुध्द मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम ४ व उपरोक्त सात जणाांविरुध्द सहकलम ४९८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: First crime case registered in Khamgaon regarding triple talaq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.