An FIR was lodged against actress Sayani Ghosh for hurting the feelings of Hindus | हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री सायानी घोषविरोधात FIR, 'ती' म्हणे ट्विटर हॅक झाले होते 

हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री सायानी घोषविरोधात FIR, 'ती' म्हणे ट्विटर हॅक झाले होते 

ठळक मुद्देमला खात्री आहे की, आसाम पोलीस याप्रकरणी लक्ष घालेल आणि रिमांडसाठी विचारणा करेल. 

भाजपा नेता आणि मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी बंगाली अभिनेत्री सायानी घोषविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रॉय यांनी अभिनेत्री सायानीविरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. बंगाली अभिनेत्री सायानीने ट्वीटरवर एक मीम शेअर केला होता. त्या मीमद्वारे तिने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

 

अभिनेत्रीने यावर आपली बाजू मांडताना संगीतले की, मीम आताचे नसून फेब्रुवारी २०१५ चे आहे आणि ते मीम मी पोस्ट केले नसून ट्विटर अकाउंट हॅक केले होते. त्याने ते ट्वीट केले होते. रॉय यांनी सायानी घोषला लक्ष्य करत ट्विटरवर लिहिले आहे की, तुम्ही भा. दं. वि. कलम २९५ अ अन्वये कायद्याचे उल्लंघन केले आहे, आता त्याचे दुष्परिणाम भोगण्यास तयार राहा. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये रॉय यांनी लिहिले आहे की, तुमच्याविरोधात कोलकातामध्ये FIR दाखल झाला आहे. गुवाहाटीच्या एका तरुणाने मला सांगितले त्याच्या धार्मिक भावना मीममुळे दुखावल्या गेल्या आहेत. आणि तो देखील FIR दाखल करणार आहे. मला खात्री आहे की, आसाम पोलीस याप्रकरणी लक्ष घालेल आणि रिमांडसाठी विचारणा करेल. 

 

 भाजपा नेत्याने असे देखील सांगितले की, अजून एका व्यक्तीने सायानीच्या विरोधात बंगळुरूमध्ये FIR नोंद केला आहे. या पूर्ण प्रकरणी आपली बाजू मांडताना घोषने ट्विटरवर सांगितले, माझ्या प्रिय मित्रांनो, २०१५ सालच्या माझ्या ट्वीट लक्ष वेधले असून हे खूपच आपत्तीजनक आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगते की, २०१० साली मी ट्विटर जॉईन केले. काही दिवसांनी मला त्यात रस नसल्याने ते अकाउंट फक्त होते. नंतर मला कळले की, माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे

Web Title: An FIR was lodged against actress Sayani Ghosh for hurting the feelings of Hindus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.