क्लबहाऊस चॅटवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील टिपण्णी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:50 PM2022-01-21T21:50:05+5:302022-01-21T21:50:37+5:30

Club Haouse Chat : आता क्लब हाउस नावाच्या ॲपवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जात आहेत. काही समाजकंटक त्या ॲपवर द्वेष पसरवत आहेत.

FIR lodged against Muslim women for making obscene remarks on clubhouse chat | क्लबहाऊस चॅटवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील टिपण्णी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल

क्लबहाऊस चॅटवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील टिपण्णी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल

googlenewsNext

नुकतेच बुल्ली बाई ॲपच्या माध्यमातून सोशल मीडियावर मुस्लिम महिलांविरोधात द्वेष पसरवण्याचे प्रकरण समोर आले. आता क्लब हाउस नावाच्या ॲपवर मुस्लिम महिलांविरोधात अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जात आहेत. काही समाजकंटक त्या ॲपवर द्वेष पसरवत आहेत. दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या कलम १५३ए, २९५ए, ३५४ए अंतर्गत एफआयआर क्रमांक १२/२२ नोंदवला आहे. तत्पूर्वी, दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडे ही बाब लक्षात आणून देऊन एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.
 
दिल्ली पोलिसांनी मुस्लिम महिलांना लक्ष्य करणाऱ्या क्लबहाऊस सेशन चॅटचा तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. जेथे क्लबहाऊस ॲपवरील सत्रादरम्यान, काही समाजकंटक लोकांचा एक गट अश्लील टिपण्णी करताना दिसला.

ॲपवर सुरू असलेल्या त्या सत्राचे शीर्षक होते, "मुस्लिम मुली हिंदू मुलींपेक्षा जास्त सुंदर असतात." ज्यामध्ये लोकांनी मुस्लिम महिलांविरोधात अश्लील टिपण्णी केली आणि त्यांच्या शरीराबद्दल असभ्य भाष्य केले. 


असे प्रकरण समोर आले
@jaiminism या आयडीसह एका ट्विटर हँडलने क्लबहाऊस ॲप सेशनच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग ट्विट केले होते, ज्यामध्ये काही तरुण मुस्लिम मुलींवर अश्लील टिप्पणी करताना ऐकले होते. या सेशनमध्ये अनेक मुलींचाही सहभाग होता. युझरने @sallos.hell आणि @wtf.astic या दोन क्लबहाऊस आयडीचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले, ज्यांनी "मुस्लिम मुली हिंदू मुलींपेक्षा जास्त सुंदर आहेत" या मथळ्यासह क्लबहाऊस रूप सुरू केले, तेव्हा संभाषण झाले होते.


दिल्ली महिला आयोगाने स्वत:हून दखल घेतली
या प्रकरणावरून ट्विटरवर खळबळ उडाली आहे. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलला पत्र लिहून एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. आयोगाने दिल्ली पोलिसांकडे या लज्जास्पद प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. डीसीडब्ल्यूने या प्रकरणातील कारवाईचा तपशीलवार अहवाल आयोगाला सादर करण्यासाठी दिल्ली पोलिसांना 5 दिवसांची मुदत दिली होती.

अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल
या प्रकरणाची दखल घेत, दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने IPC कलम 153A (धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये वैर वाढवणे), 295A (जाणूनबुजून कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावणे, त्याच्या धर्माचा अपमान करणे)आणि 354A (लैंगिक छळ) गुन्हा दाखल केला.  या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी दिल्ली पोलीस सध्या ॲप कंपनीकडून तपशील मागवत आहेत.

Web Title: FIR lodged against Muslim women for making obscene remarks on clubhouse chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.