विवेक ओबेरॉयची पत्नीसोबत बुलेट सवारी पण 'तो' Video शेअर करणं पडलं भारी; पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:57 PM2021-02-20T13:57:16+5:302021-02-20T14:01:29+5:30

Vivek Oberoi News : विवेकने बुलेट सवारीचा आनंद लुटला. पण त्याचा तो व्हिडीओ शेअर करणं त्याला आता भारी पडलं आहे.

FIR Against Vivek Oberoi For Not Wearing Mask on Bike With Wife | विवेक ओबेरॉयची पत्नीसोबत बुलेट सवारी पण 'तो' Video शेअर करणं पडलं भारी; पोलिसांनी केली कारवाई

विवेक ओबेरॉयची पत्नीसोबत बुलेट सवारी पण 'तो' Video शेअर करणं पडलं भारी; पोलिसांनी केली कारवाई

Next

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसोबत बुलेट सवारीचा आनंद लुटला. पण त्याचा तो व्हिडीओ शेअर करणं त्याला आता भारी पडलं आहे. विवेक ओबेरॉयला विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवणं महागात पडलं असून मुंबईपोलिसांनी कारवाई केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाइन डे' च्या निमित्ताने विवेक ओबेरॉयने बाईकवरुन पत्नीसोबत सैर केली होती. नंतर त्याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र व्हिडीओमध्ये त्याने बाईक चालवताना हेल्मेट घातले नव्हते तसेच चेहऱ्यावर मास्क देखील लावला नव्हता. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी आता कारवाई केली आहे.

विवेक ओबेरॉय याच्यावर मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेल्मेट आणि मास्कविना बाईक चालवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे, विवेकने व्हॅलेंटाइन डेला पत्नीसोबत बाईक राईडचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्यासोबत त्याने "मी, माझी बायको आणि ती… रिफ्रेश करणारी जॉयराईड, ‘व्हॅलेंटाइन डेची काय मस्त सुरुवात झालीय" असं कॅप्शन दिलं होतं. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनू वर्गीस यांनी हा ट्वीटरवर पोस्ट केला व त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

"विवेकने विनाहेल्मेट बाईक चालवून वाहतूक सुरक्षा नियम मोडला आहे, तसेच त्याने चेहऱ्यावर मास्क देखील घातलेले नाही…याद्वारे युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जातो, त्यामुळे त्याला दंड आकारावा" असं वर्गीस यानी लिहिलं होतं. बाईक राईडचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर विवेक ओबेरॉय विरोधात ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिकच्या नियमांतर्गत ही कारवाई केली आहे. विवेकला 500 रुपयांचे ई-चलान मोबाईलवर पाठवण्यात आलं आहे. तसेच जुहू पोलिस स्थानकात विवेक विरोधात आयपीसी कलम 188 आणि 269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"मी दीपिका किंवा आलिया नाही, कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते"; कंगनाचा सणसणीत टोला

 काँग्रेस आमदाराला कंगनाने सणसणीत टोला लगावला आहे. मध्य प्रदेश बैतूलच्या मुलताई विधानसभेचे काँग्रेस आमदार (Congress MLA) सुखदेव पानसे (Sukhdeo Panase) यांच्यावर तिने हल्लाबोल केला आहे. पानसे यांनी कंगनाला नाचणारी आणि गाणारी म्हटलं होतं. यावर कंगनाने "आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते" असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. कंगना राणौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हा जो कोणी मुर्ख आहे, याला नाही माहिती की मी दीपिका, कतरीना किंवा आलिया भट्ट नाही. मी एकटी आहे, जिने आयटम नंबर करण्यास नकार दिला. मी मोठे अभिनेते खान आणि कुमार यांच्यासोबत सिनेमे करण्यासही नकार दिला होता. याच कारणामुळे पूर्ण बॉलिवूड गँग, महिला आणि पुरुष सगळेच माझ्या विरोधात आहेत. मी एक राजपूत महिला आहे. जी कंबर हालवत नाही तर थेट हाडं मोडते" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title: FIR Against Vivek Oberoi For Not Wearing Mask on Bike With Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.