...अखेर चुकीची दुरुस्ती, २४७ अंमलदाराच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 09:32 PM2020-10-29T21:32:01+5:302020-10-29T21:32:51+5:30

मुंबईतील१७७ जणांचा समावेश

... Finally, the Police Headquarters made correction, with the promotion of 247 officers, transfers were canceled. | ...अखेर चुकीची दुरुस्ती, २४७ अंमलदाराच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या रद्द

...अखेर चुकीची दुरुस्ती, २४७ अंमलदाराच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या रद्द

Next
ठळक मुद्देमहानिरीक्षक ( आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले . त्यामुळे सबधितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मुंबई  -   सेवानिवृत्तीला अवघी काही वर्षे शिल्लक राहिली  असताना  अंमलदाराना मूळ घटकांपासून ४००,५०० किलोमीटर दुरच्या ठिकाणी बदली करण्यातील चूक अखेर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या  अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना उमगली आहे.  उपनिरीक्षक म्हणून बढती देताना  अन्य घटकांत बदली केलेल्या राज्यातील २४७ अधिकाऱ्याच्या बदल्या रद्द करून त्यांना मूळ घटकात नेमण्यात आले आहे. महानिरीक्षक ( आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले . त्यामुळे सबधितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
 

बदली रद्द झालेल्यामध्ये मुंबईतील १७७ पीएसआयचा समावेश आहे. उपनिरीक्षकाच्या अहर्ता परीक्षा २०१३मधील  उत्तीर्ण १०६१ अंमलदाराना २२ ऑक्टोबरला पदोन्नतीचे आदेश प्रधान यांनी जारी केले होते. मात्र सद्या कार्यरत असलेल्या घटकांत रिक्त जागा असताना त्यांना रोटेशन पद्धतीने  नागपूर, अन्य ठिकाणी बदली केली होती. एका ठिकाणी ३२,३३ वर्षे सेवा केल्यानंतर नोकरीची काही वर्षे शिल्लक असताना त्यांच्या अन्यत्र बदल्या केल्याने कौटुंबिक व अन्य समस्यांना सामोरे जावे लागणार  होते, या विक्षिप्त धोरणामुळे संबधितांकडून नाराजी व्यक्त होत होती. बदली रद्द करण्यासाठी घटक प्रमुखाकडून२४७ जणांनी अर्ज केले होते. अखेर चूक लक्षात आल्याने  त्याची दखल प्रधान यांनी पूर्वीचा आदेश रद्द केला. सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी पदोन्नती देण्याच्या सूचना घटक प्रमुखांना केल्या आहेत.


४०० अधिकाऱ्याच्या बदल्याचे गॅझेट
 

महासंचालक कार्यालयातून  होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यासाठी ५ वेळा मुदतवाढीला  ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.  मात्र शुक्रवारी ईद मिलादची सुट्टी असल्याने आज अखेरची मुदत होती. तो मुहूर्त  साधत  निशस्त्र,राखीव दल, वायरलेस, एमटी  आदी विभागातील सुमारे ४००वर  निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र विनंतीच्या बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत.

Web Title: ... Finally, the Police Headquarters made correction, with the promotion of 247 officers, transfers were canceled.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.