कुंपणानेच शेत खाल्ले! सुरक्षा रक्षकांनीच चोरले ७५ लाखांचे साहित्य; एमआयडीसीतील फार्मास्युिटकल कंपनीत चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 09:34 PM2021-07-27T21:34:43+5:302021-07-27T21:43:32+5:30

Crime News : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The fence ate the farm! 75 lakh worth of literature stolen by security guards; Theft at a pharmaceutical company in MIDC | कुंपणानेच शेत खाल्ले! सुरक्षा रक्षकांनीच चोरले ७५ लाखांचे साहित्य; एमआयडीसीतील फार्मास्युिटकल कंपनीत चोरी

कुंपणानेच शेत खाल्ले! सुरक्षा रक्षकांनीच चोरले ७५ लाखांचे साहित्य; एमआयडीसीतील फार्मास्युिटकल कंपनीत चोरी

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ ऑगस्ट २००८ ते २० जुलै २०२१ दरम्यान हे साहित्य आरोपींनी लंपास केले. ते लक्षात आल्यानंतर घोष यांनी संबंधितांकडे विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले.

नागपूर - पुण्यातील सिरम बायोटिकचे युनिट असलेल्या मात्र गेल्या १७ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या स्थानिक फार्मास्युिटकल कंपनीत मोठी चोरी झाली. सुरक्षेची जबाबदारी दिलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनातील काही जणांनी तसेच सिक्युिरटी गार्डसनी १३ वर्षांत ७५.७४ लाखांचे साहित्य चोरून नेले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसीत महाराष्ट्र ऑन्टिबायोटिक अॅन्ड फार्मास्युिटकल लिमिटेड नावाने कंपनी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड लस निर्माण करणाऱ्या पुण्यातील सिरम कंपनीशी संबंधित हे युनिट आहे. २००४ पासून कंपनी बंद अवस्थेत आहे. या कंपनीच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी बॉम्बे सिक्युरिटी सर्व्हीसेसचे सुपर वायझर, एमएपीएल कंपनी तसेच सिक्युरिटी गार्डवर सोपवली. या सर्वांनी संगणमत करून कंपनीत असलेल्या विविध मशिनरीजचे पार्ट, एसी, ईलेक्ट्रीक साहित्य, लेबॉरटरी ईक्विपमेंट, कॉम्प्युटर, फर्निचर असे एकूण ७५ लाख, ७४ हजारांचे साहित्य चोरले.
 

संबंधितांचे कानावर हात
२५ ऑगस्ट २००८ ते २० जुलै २०२१ दरम्यान हे साहित्य आरोपींनी लंपास केले. ते लक्षात आल्यानंतर घोष यांनी संबंधितांकडे विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे कंपनीतर्फे मिता देवतोष घोष (वय ५६, शितलानगर, देहू रोड, पुणे)यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी सोमवारी चोरीचा गुन्हा दाखल केला. संशयीतांची चाैकशी सुरू आहे.

Web Title: The fence ate the farm! 75 lakh worth of literature stolen by security guards; Theft at a pharmaceutical company in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.