बापलेकीच्या नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 02:39 PM2020-07-30T14:39:41+5:302020-07-30T14:43:50+5:30

समाजात काय विचार केला जाईल या लाजखातर आणि कुटूंबाच्या नाकारण्याच्या भीतीने तिने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळाटाळ केली'', असे शुक्ला म्हणाल्या.

A father who raped a minor daughter was handcuffed | बापलेकीच्या नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना बेड्या 

बापलेकीच्या नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना बेड्या 

googlenewsNext
ठळक मुद्दे 45 वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.तो अनेकदा मद्यधुंद होऊन आपल्या 13 वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती करत असे.

नोएडा - उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे बुधवारी एका 45 वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.


एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले की, हा आरोपी बाप बिहारमधील मजूर आहे, तो अनेकदा मद्यधुंद होऊन आपल्या 13 वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती करत असे. पोलीस उपायुक्त (महिला सुरक्षा) वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, आरोपीच्या पत्नीने फेज २ पोलीस स्टेशनमध्ये 24 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. पुढे शुक्ला म्हणाल्या, "दारू पिऊन तिच्या पतीने आपल्या मुलीवर बलात्कार केला असा आरोप महिलेने केला आहे. परंतु, समाजात काय विचार केला जाईल या लाजखातर आणि कुटूंबाच्या नाकारण्याच्या भीतीने तिने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळाटाळ केली'', असे शुक्ला म्हणाल्या.

आता एफआयआर नोंदवून आणि प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली, असे डीसीपीने सांगितले. त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम  376 (बलात्कार) तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

Web Title: A father who raped a minor daughter was handcuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.