बापाने मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने पत्नीला मारहाण करून काढले घराबाहेर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 09:37 PM2021-06-17T21:37:34+5:302021-06-17T21:39:14+5:30

Crime News : ही बाब बस्तीच्या हर्रैय्या पोलिस स्टेशन अंतर्गत एका खेड्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

Father attempts to rape daughter; He beat his wife and took her out of the house | बापाने मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने पत्नीला मारहाण करून काढले घराबाहेर 

बापाने मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने पत्नीला मारहाण करून काढले घराबाहेर 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांना दिलेल्या तक्रारीत पत्नीने असा आरोप केला आहे की, दीड वर्षापूर्वी तिच्याच वडिलांनी तिच्या १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता.

उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातून एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्याच मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. यावर जेव्हा त्याची पत्नी आक्षेप घेते तेव्हा त्याने तिला मारहाण केली व तिला घराबाहेर काढले. पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. ही बाब बस्तीच्या हर्रैय्या पोलिस स्टेशन अंतर्गत एका खेड्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

दीड वर्षांपूर्वीही मुलीवर बलात्कार करण्यात आला होता

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पत्नीने असा आरोप केला आहे की, दीड वर्षापूर्वी तिच्याच वडिलांनी तिच्या १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. या विरोधात तक्रार दाखल केली असता तो पळून गेला. पुन्हा परत आल्यानंतर १६ जून रोजी त्याने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. याला प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण केली व तिला घराबाहेर काढले.



आरोपी वडिलांना अटक

याप्रकरणी तक्रारीच्या आधारे हर्रैया पोलिसांनी आरोपी वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असल्याचे एसपी आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

Web Title: Father attempts to rape daughter; He beat his wife and took her out of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.