फॅशन डिझायनर मारहाण प्रकरण : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 01:52 AM2019-06-27T01:52:10+5:302019-06-27T02:02:28+5:30

फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी ठाणे न्यायालयासमोर बुधवारी हजर न राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे.

Fashion designer assault: actress Prajakta Mali again summons | फॅशन डिझायनर मारहाण प्रकरण : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा समन्स

फॅशन डिझायनर मारहाण प्रकरण : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा समन्स

Next

ठाणे  - फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी ठाणे न्यायालयासमोर बुधवारी हजर न राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. बुधवारी ती हजर न राहिल्याने मनचंदा यांचे वकील सचिन पवार यांनी न्यायालयापुढे वॉरंट बजावण्याची मागणी केली होती. पहिले समन्स बजावण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेल्याची माहितीही न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्याचे पवार यांनी सांगितले.

मनचंदा यांनी ५ एप्रिलला काशिमीरा पोलीस ठाण्यात प्राजक्ता माळी हिच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर माळी हिच्याविरुद्ध ३२३ आणि ५०४ अंतर्गत एनसी दाखल झाली होती. तसेच तिने ठोशाबुक्कयांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर, मनचंदा यांनी ठाणे न्यायालयात धाव घेऊन तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत, प्रथम न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राव जडेजा यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत २६ जूनला माळी हिला न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावला होते. परंतु, माळी किंवा तिचे वकील बुधवारी न्यायालयात हजर राहिलेच नाही. यावेळी मनचंदा यांचे वकील पवार यांनी समन्स बजावण्यासाठी पोलीस माळी हिच्या घरी गेले होते. त्या घरी नसल्याने पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. याबाबत, न्यायालयात माहिती देऊन त्यांच्याविरुद्ध वॉरंट बजावण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने माळी हिला न्यायालयात हजर राहण्याबाबत दुसरे समन्स बजावल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Fashion designer assault: actress Prajakta Mali again summons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.