भिगवणमध्ये लॉजवरील वेश्या व्यवसाय उघडकीस : गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 08:44 PM2019-08-06T20:44:40+5:302019-08-06T20:46:29+5:30

सत्यजित हॉटेल भिगवण येथे बेकायदा अवैध वेश्या व्यवसाय चालत आहे अशी बातमी मिळाल्यानेसंबंधित लॉजवर छापा टाकला.

exposed prostitution business at the lodge in Bhigwan : action by Criminal Investigation Department | भिगवणमध्ये लॉजवरील वेश्या व्यवसाय उघडकीस : गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

भिगवणमध्ये लॉजवरील वेश्या व्यवसाय उघडकीस : गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

googlenewsNext

भिगवण :  इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका लॉजवर बारामती गुन्हे अन्वेषण पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे. पश्चिम बंगाल व बांगलादेश येथील पीडित महिलांचा या व्यवसायात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आज रोजी बारामती शहरात पेट्रोलिंग करत असताना अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना  यांना  भिगवण येथील वेश्या व्यवसायाबाबत गोपनीय बातमी मिळाली.सत्यजित हॉटेल भिगवण येथे बेकायदा अवैध वेश्या व्यवसाय चालत आहे अशी बातमी मिळाल्याने मीना यांनी तातडीने बारामती क्राईम ब्रँच प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना संबंधित लॉजवर छापा टाकण्याची सुचना केली.त्यानुसार पथकाने त्या लॉजवर सापळा रचुन छापा टाकला.यावेळी सत्यजित हॉटेल चे लॉज वर तीन पीडित महिला मिळून आल्या.  त्यातील २ महिला पश्चिम बंगाल व १ महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे . याठीकाणी रोख रक्कम मोबाईलसह  १० हजार ६८० चा ऐवज सापडला. वेश्याव्यवसाय प्रकरणी आरोपी रविश जयराम शेट्टी (वय ३६, रा.मदनवाडी, ता.इंदापूर मूळ रा. विघनेश्वर निलयात ओसुर ता.कंदापुर जि. उडपी रा.कर्नाटक), राजेश आनंद देवडिका (वय २८, रा.वामद पदाव बहुवाड दक्षिण
कर्नाटक,सध्या सत्यजित हॉटेल मध्ये) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक संदिप पाटील ,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना  यांचे
मार्गदर्शना खाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे, शर्मा पवार,इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  मधुकर पवार, भिगवण पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक जीवन माने, उपनिरीक्षक सचिन पत्रे, रियाझ शेख, महिला शिपाई रुपाली पवार, पोलीस नवनाथ भागवत यांनी ही कारवाई केली.
———————————

Web Title: exposed prostitution business at the lodge in Bhigwan : action by Criminal Investigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.