४० व्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअरने संपवले आयुष्य; दादरमध्ये उडाली खळबळ 

By पूनम अपराज | Published: October 1, 2021 06:18 PM2021-10-01T18:18:41+5:302021-10-01T19:17:41+5:30

Suicide News : याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

The employee jumped from the 40th floor and ended his life; panic situation in Dadar | ४० व्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअरने संपवले आयुष्य; दादरमध्ये उडाली खळबळ 

४० व्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअरने संपवले आयुष्य; दादरमध्ये उडाली खळबळ 

googlenewsNext
ठळक मुद्दे मृत इसमाचे नाव निखिल माधव जोशी असं असून ते दादरमध्ये कबुतरखाण्याच्या परिसरात राहण्यास होते.

पूनम अपराज

मुंबई - दादर फुल मार्केटशेजारी असलेल्या सनशाईन या इमारतीच्या ४० व्य मजल्यावरून उडी मारून एका ५१ वर्षीय कर्मचाऱ्याने आपलं आयुष्य संपवलं. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने दादर परिसरात एकच खळबळ माजली होती. मृत इसमाचे नाव निखिल माधव जोशी असं असून ते दादरमध्ये कबुतरखाण्याच्या परिसरात राहण्यास होते. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

दादर रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पश्चिमेकडील सनशाईन टॉवरमध्ये ३६ व्या मजल्यावर सुनंदा स्पेशालिटी कोटिंग प्रा. लि. या कंपनीत निखिल जोशी हे इंजिनिअर म्हणून नोकरी करत होते. गेली २० पेक्षा अधिक वर्ष निखिल या कंपनीत काम करत होते. मात्र, काल गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास निखिल यांनी सनशाईन टॉवरच्या ४० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण पोलीस शोधत असून पोलिसांचा तपास सुरु आहे. 

 

Web Title: The employee jumped from the 40th floor and ended his life; panic situation in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.