धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती

By जयदीप दाभोळकर | Published: January 9, 2021 01:57 PM2021-01-09T13:57:04+5:302021-01-09T13:59:24+5:30

घटनास्थळी उपस्थित लोकं दोघांमधील भांडण थांबवण्याऐवजी काढत होते व्हिडीओ

elder brother keeps biting the neck of little boy making a crowd of people video viral sikar | धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती

धक्कादायक : मोठा भाऊ भररस्त्यात छोट्या भावाचा गळा कापत होता, लोकं व्हिडीओ बनवत होती

Next
ठळक मुद्देपोलिसांकडून तपासाला सुरूवातशाळेत जात असताना आरोपीनं केली आपल्या चुलत भावाची हत्या

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भररस्त्यात एक व्यक्ती आपल्या छोट्या भावाचा ब्लेडनं गळा कापत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा लाईव्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सीकर जिल्ह्यातील दांतारामगढ येथे ही धक्कादायक घटना घडली. एका २१ वर्षीय तरूणानं आपल्या १० वर्षीय भावाचा भररस्त्यात ब्लेडनं गळा कापला आणि धक्कादायक म्हणजे आसपास उभी असलेली सर्व लोकं कोणीही त्याला मदत न करता त्याचा व्हिडीओ बनवत होते.

दोन भावामध्ये झालेलं भांडण त्या ठिकाणी उभे असलेले अनेक लोक पाहत होते. परंतु अनेकांनी ते भांडण थांबवण्याऐवजी त्याचा व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. या घटनेतच मोठ्या भावानं आपल्या लहान चुलत भावाचा गळा कधी कापला हेदेखील त्यांना समजलं नाही. ज्यावेळी रस्त्यावर लोकांना रक्ताचं थारोळं दिसलं त्यावेळी लोकांनी त्याच्या दिशेने पळापळ सुरू केली. परंतु तोवर उशिर झाला होता. 

१० वर्षीय मुलगा आपल्या घरातून आपल्या शाळेत मिळणारा पौष्टिक आहार घेण्यासाठी जात होता. परंतु त्याच वेळी त्याच्या चुलत भावानं त्याला पकडत भररस्त्यात त्याची गळा कापून हत्या केली. या घटनेनंतर त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आरोपीला पकडलं. या दरम्यान आरोपीनंदेखील मी याची गळा कापून हत्या केली आहे आणि पोलिसांनादेखील मी हेच सांगणार आहे असं म्हटलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांनादेखील या घटनेची माहिती दिली.

"आपले काका कायम आपली मजा उडवत होते. लहानपणी त्यांनी मला शिकूही दिलं नाही. मला काहीच येत नाही असं ते सतत म्हणायचे. म्हणून मी त्यांच्या मुलाचीच हत्या केली," असं आरोपीनं सांगितलं. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी हा अनेक दिवसांपासून त्या मुलाला मारण्याची तयारी करत असल्याचंही समोर आलं. तसंच दोन्ही कुटुंबांमध्येही वाद सुरू असल्याचंही तपासादरम्यान पुढे आलं.

Web Title: elder brother keeps biting the neck of little boy making a crowd of people video viral sikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.