ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 09:35 PM2020-01-10T21:35:44+5:302020-01-10T21:37:28+5:30

चंदा कोचर यांची मुंबईतली घरं आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा समावेश आहे.

ED's big action, Seized property worth Rs 78 crore of Chanda Kochhar in Mumbai with house | ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त

ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त

Next
ठळक मुद्देहा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला ३२५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.

मुंबई -  बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीत व्हिडीओकॉन कर्जप्रकरणात दोषी ठरलेल्या चंदा कोचर यांची मुंबईतली घरं आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा समावेश आहे.

चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असताना आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला ३२५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला २० बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा १० टक्के होता. मात्र, धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून नूपॉवर रिन्यूएबल्स नावाची कंपनी सुरु केली. ज्यात दीपक यांची ५० टक्क्यांची भागीदारी होती. हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.



या प्रकरणात १ मार्च रोजी ईडीने धाडी टाकल्या होत्या. चंदा कोचर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय तसेच व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्या मुंबई आणि औरंगाबादेतील ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन उद्योग समूहाला १,८७५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉन समूहाच्या वतीने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या एका कंपनीत गुंतवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. ही गुंतवणूक नंतर कंपनीला बहाल केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केलेला असून, त्यावरून ईडी तपास करीत आहे.

चंदा कोचर यांचे केलेले निलंबन योग्यच

या प्रकरणात व्हिडिओकॉन समूहातील व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लि. आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लि. या कंपन्यांनाही सीबीआयने आरोपी केलेले आहे. याशिवाय धूत यांनी स्थापन केलेली सुप्रीम एनर्जी आणि दीपक कोचर यांची नूपॉवर रिन्यूएबल्स ही कंपनीही आरोपी आहे. वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर २००८ मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला  आयसीआसीआय बँकेने तब्बल ६४ कोटी रुपयांचं कर्ज दिलं. मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या ९ लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली होती. हा कोचर यांचा हा काळाबाजार आता उघड झाला आहे. चंदा कोचर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१९ महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने कोचर यांचा राजीनामा मंजूर करत कोचर यांना आयसीआयसीआय बँकेच्या सर्व जबाबदारीतून मुक्त करण्यात आले होते. बँकेने २०१९ जानेवारी महिन्यात कोचर यांचे निलंबन केले आणि बँकेच्या या निर्णयाला आरबीआयने मंजुरी दिल्याने चंदा कोचर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


Web Title: ED's big action, Seized property worth Rs 78 crore of Chanda Kochhar in Mumbai with house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.