अरे बापरे! हद्दीच्या वादात झिजविले चार पोलीस ठाण्याचे उंबरठे, २ दिवसांनी सापडला मृतदेह 

गरीब कुटुंबाची रात्रभर फिरफिर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 05:27 PM2020-08-14T17:27:45+5:302020-08-14T17:46:47+5:30

Due to juridiction disputes they were vidited four police stations, body found 2 days later | अरे बापरे! हद्दीच्या वादात झिजविले चार पोलीस ठाण्याचे उंबरठे, २ दिवसांनी सापडला मृतदेह 

अरे बापरे! हद्दीच्या वादात झिजविले चार पोलीस ठाण्याचे उंबरठे, २ दिवसांनी सापडला मृतदेह 

fsharetweetwhatsappNext »
ठळक मुद्देया कुटुंबाने रात्रभर पोलिसांचे उंबरठे झिजविले, मात्र, कोणालाच पाझर फुटला नाही.  या कुटुंबाने त्यांची ही अट मान्य केली व तरुणांनी शोध कार्य सुरु केले.

जळगाव :  मेहरुण तलावात आमचा भाऊ बुडाला आहे, तुम्ही काही तरी मदत करा, अशी याचना करणाऱ्या  साईनाथ गोपाळ या तरुणाच्या कुटुंबाला मदत तर सोडाच, उलट हद्दीचा वाद निर्माण करुन चार पोलीस ठाणे फिरविले. या कुटुंबाने रात्रभर पोलिसांचे उंबरठे झिजविले, मात्र, कोणालाच पाझर फुटला नाही.
 
तलावात बुडालेला साईनाथ सापडत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी सर्व प्रथम एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली असता तो समता नगरातील रहिवाशी असल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे कुटुंब रामानंद नगर पोलीस स्टेशनला गेले. तेथेही तोच कित्ता गिरविण्यात आला. मुलगा पिंप्राळा रेल्वे गेटजवळून गेल्याचे सांगून त्यांना शहर पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. तेथूनही जिल्हा पेठची पाठविण्यात आले. जिल्हा पेठला गेल्यावर मेहरुण तलाव एमआयडीसी हद्दीत असल्याने तिकडे पाठविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हे कुटुंब शहरातील सर्व पोलीस स्टेशन फिरुन परत रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा दोन पोलीस कर्मचाºयांना पाठविण्यात आले.

पोलीस म्हटले, पाण्यात तरंगून आला तर ठिक नाही तर घरी जा !
रात्री साईनाथचा शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंब चिंतेत होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी काही तरुणांच्या माध्यमातून शोध घेतला, मात्र तेव्हाही काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत साईनाथ पाण्यातून तरंगत वर येईल व नाही आला तर तुम्ही घरी निघून जा असा सल्ला या पोलिसांनी दिला. तरुणाचा शोध लागावा यासाठी महापालिका किंवा तहसीलदार यांना कळविण्याची तसदी घेतली नाही.

गरीबीची अशीही थट्टा
या घटनेत पोलीस, महापालिका व महसूल प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले. गोपाळ कुटुंब गरीब होते, त्यांच्या मागे कोणीच नाही म्हणूनच कि काय त्यांच्यावर अशी वेळ आली. मुलाचा शोध घेण्यासाठी हे कुटुंब अक्षरश: पोहणाऱ्या तरुणांच्या विनवण्या करीत होते. काही जण मदतीला आले, मात्र त्यासाठी सहाशे रुपये लागतील, मग साईनाथ सापडला तरी आणि नाही सापडला तरी पैसे द्यावेच लागतील अशी अट ठेवली. या कुटुंबाने त्यांची ही अट मान्य केली व तरुणांनी शोध कार्य सुरु केले.

मोबाईल व कपडे सापडले

तलावाच्या काठी साईनाथ याचे शर्ट आढळून आले. त्याचा भाऊ सुकलाल व बहिण उषा रात्रीपासून तलावाच्याच काठी आक्रोश करीत होते. गुरे चारणाऱ्या मुलांना एक मोबाईल सापडला तो साईनाथचा निघाला. या मुलांनी प्रामाणिकपणे मोबाईल परत करुन त्यांना धीर दिला. सकाळी समता नगरातील नागरीक मोठ्या संख्येने जमले होते. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबाचा आक्रोश सुरु होता.

पत्नी प्रसुतीसाठी माहेरी
साईनाथ हा विवाहित असून पहिलीच प्रसुती असल्याने पत्नी आशाबाई महिनाभरापासून माहेरी मुंबई येथे गेलेली आहे.आई शांताबाई, वडील शिवाजी रामा गोपाळ, भाऊ सुकलाल, बहिण उषा आदी जण मजुरीचे काम करतात.

 

मामाच्या मुलांसोबत माझा भाऊ तलावावर फिरायला आलेला होता. पाय धुताना तो तलावात बुडाला. पोलीस वेगवेगळे पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला देत आहेत. पाण्यातून तरंगत वर नाही आला तर घरी निघून जा असे पोलिसांनी सांगितले. पोहणाºया तरुणांना पैसे देऊन भावाचा शोध घेत आहोत. - सुकलाल गोपाळ, भाऊ
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

Web Title: Due to juridiction disputes they were vidited four police stations, body found 2 days later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.