Dr. Narendra Dabholkar Murder case : Sanjeev Punalekar got CBI custody till June 23 | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : संजीव पुनाळेकरला २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी  
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : संजीव पुनाळेकरला २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी  

ठळक मुद्देपुनाळेकरला अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.  पुनाळेकरच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्यावर सुनावणी सुरू आहे.

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकरला पुणे येथील सत्र न्यायालयाने २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावली आहे. पुनाळेकरला अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.  सीबीआयने बुधवारी चौकशीसाठी पुनाळेकरला कोठडी द्यावी अशी मागणी कोर्टात केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून पुनाळेकरला अटक करण्यात आली. पुनाळेकरच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्यावर सुनावणी सुरू आहे. तसेच मुंबईसह राज्यभरात पुनाळेकरच्या सुटकेसाठी आंदोलनं करण्यात आली.  


Web Title: Dr. Narendra Dabholkar Murder case : Sanjeev Punalekar got CBI custody till June 23
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.