डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 09:43 PM2019-07-23T21:43:20+5:302019-07-23T21:48:00+5:30

भा. दं. वि. कलम ३३८, ३०४ (अ) आणि ३४ अन्वये हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. 

Dongri Building incident: offence Filed against related Officers, Contractors and Trustees | डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल 

डोंगरी इमारत दुर्घटना प्रकरण : अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात गुन्हा दाखल 

Next
ठळक मुद्देडोंगरी पोलीस ठाण्यात सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई -  डोंगरी परिसरातील तांडेल स्ट्रीट येथे असलेल्या कौसरबाग इमारत कोसळल्याची घटना १६ जुलै रोजी घडली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पालिका, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य केले. या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर अजूनही जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात सर्व संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि ट्रस्टींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. भा. दं. वि. कलम ३३८, ३०४ (अ) आणि ३४ अन्वये हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. 



 

Web Title: Dongri Building incident: offence Filed against related Officers, Contractors and Trustees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.