डोंबिवलीकरांनो सावधान! शहरातील वाहनचोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:02 PM2020-07-29T17:02:41+5:302020-07-29T17:08:55+5:30

भाजपने व्यक्त केली चिंता आणि घेतली वरिष्ठ पोलिसांची भेट

Dombivalikars beware! vehicle theft and house breaking increased in the city | डोंबिवलीकरांनो सावधान! शहरातील वाहनचोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले

डोंबिवलीकरांनो सावधान! शहरातील वाहनचोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळामध्ये काही डोंबिवलीकर त्यांच्या मूळ गावी गेलेले असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन चोरांनी अनेक ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत.सर्वसामान्य नागरिकांनी पै पै करून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत करायची संसार जमवायचा आणि अशा संकटांमध्ये दुसरं संकट म्हणून घरातील सर्व सामान चोरीला जाणे हे योग्य नाही.

डोंबिवली - पूर्व पश्चिम आणि ग्रामीण या भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दुचाकी, चार चाकी चोर, रिक्षा चोरी आणि घरफोड्यांचा त्यात समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये काही डोंबिवलीकर त्यांच्या मूळ गावी गेलेले असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन चोरांनी अनेक ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत भाजपच्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  


महिनाभरात सुमारे 25 ठिकाणी अशा  घटना घडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी पै पै करून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत करायची संसार जमवायचा आणि अशा संकटांमध्ये दुसरं संकट म्हणून घरातील सर्व सामान चोरीला जाणे हे योग्य नाही. शहरात 4 पोलीस ठाणे असून त्या सगळ्या ठिकाणी वाहने चोरीला गेलेले आहेत, त्या मालकाना त्या गाड्या मिळाव्यात. शेलार चौक येथील इंदिरा नगर त्रिमुर्ती नगर या वस्तीमधील एकाच दिवशी सहा घरे फोडण्यात आले आहेत, हे गंभीर आहे. पोलिसांनी तातडीने या मध्ये लक्ष घालावे आणि या चोरांना पकडण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी पक्षाचे डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, नगरसेवक मुकुंद पेडणेकर, भाजयुमो अध्यक्ष  मिहिर देसाई, मोहन नायर, राजु शेख, संजीव बिडवाडकर उपस्थित होते.

 

 

Web Title: Dombivalikars beware! vehicle theft and house breaking increased in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.