डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण: 21 जणांना न्यायालयात उद्या करणार हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:13 PM2021-09-28T22:13:11+5:302021-09-28T22:13:59+5:30

Dombivali Gang rape case : आरोपींची कोठडी वाढणार?

Dombivali Gang rape case: 21 to appear in court tomorrow | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण: 21 जणांना न्यायालयात उद्या करणार हजर

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण: 21 जणांना न्यायालयात उद्या करणार हजर

Next
ठळक मुद्देसरकारी आणि आरोपींच्या वकीलांच्या होणा-या युक्तिवादावर न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

डोंबिवली: 15 वर्षीय पिडीत मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात 33 जणांना अटक करण्यात आली आहे. सुरूवातीला पकडण्यात आलेल्या 21 आरोपींची बुधवारी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पुन्हा एकदा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी तपासाबाबत पुर्णपणो मौन बाळगले गेले असलेतरी गुन्हयातील पुरावे गोळा करण्याचे काम पुर्णत्वाला आलेले नाही असे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे संबंधित आरोपींची कोठडीची मुदत वाढवून मागितली जाणार असल्याची सूत्रंची माहीती आहे. मात्र, सरकारी आणि आरोपींच्या वकीलांच्या होणा-या युक्तिवादावर न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.


बुधवारी 22 सप्टेंबरला मध्यरात्री सामुहीक बलात्काराची तक्रार दाखल होताच तत्काळ 23 आरोपींना अटक करण्यात आली. यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 21 आरोपींना 23 सप्टेंबरला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची म्हणजेच 29 सप्टेंबर्पयत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपत त्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. एकूण 33 आरोपींपैकी 19 जणांचे वकीलपत्र महिला वकील तृप्ती पाटील यांनी घेतले आहे आणखीन चार वकीलांनीही अन्य आरोपींचे वकीलपत्र घेतले आहे. दरम्यान आरोपी पकडल्यावर त्यांच्यासह पिडीतेचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. परंतू काही आरोपींचा चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची सूत्रंची माहीती आहे.

गेले नऊ महिने बलात्काराचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेवर वारंवार बलात्कार करण्याचा प्रकार घडला आहे. अखेरचा जो 22 सप्टेंबरला बलात्कार झाला त्यातून ठोस पुरावे हाती लागल्याची माहीती मिळत आहे. तपास कोठर्पयत आला आहे शिक्षा होण्यासाठी पुरावे कितपत गोळा केले आहेत की गोळा करायचे आहेत यावर संबंधित आरोपींच्या कोठडीचे भवितव्य अवलंबून राहण्याची शक्यता आहे. गुन्हयात वापरलेल्या अजून कोणत्या गोष्टी हस्तगत करायच्या आहेत. आरोपींमध्ये पैशांची देवाणघेवाण झाली आहे ते पैसे हस्तगत करायचे आहेत. रिक्षाच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले वाहन गुन्हयात वापरले असेलतर या कारणांवरून कोठडी आणखीन दोन ते तीन दिवस पोलिस वाढवून मागतील अशीही सूत्रंची माहीती आहे.

मोठा बंदोबस्त तैनात राहणार
सामुहिक बलात्काराचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे 21 आरोपींना न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. कडेकोट बंदोबस्तामुळे सर्वसामान्यांना न्यायालयात प्रवेश नसेल अशीही माहीती मिळत आहे. मिडीयाला देखील लांब ठेवण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Dombivali Gang rape case: 21 to appear in court tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.