Dolly Bindra again in Bhopal; Filed in Khar police station | पुन्हा डॉली बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात; खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
पुन्हा डॉली बिंद्रा वादाच्या भोवऱ्यात; खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

ठळक मुद्देवी. सी. फिटनेसच्या मालकाला अभिनेत्री डॉली बिंद्राने शिविगाळ केल्याने पुन्हा एकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.वी. सी. फिटनेस या जिमच्या मालकिणीला डॉलीने तिच्या मित्राचे पैसे देणं असल्याने शिवीगाळ केली असून धमकाविले.

मुंबई - खार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वी. सी. फिटनेसच्या मालकाला अभिनेत्री डॉली बिंद्राने शिविगाळ केल्याने पुन्हा एकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. खार पोलीस ठाण्यात जिमच्या मालकिणीने डॉलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३४१, ४४७, ५०१, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये हा गुन्हा ७ फेब्रुवारीला दाखल करण्यात आला असल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.   

संजय मोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, वी. सी. फिटनेस या जिमच्या मालकिणीला डॉलीने तिच्या मित्राचे पैसे देणं असल्याने शिवीगाळ केली असून धमकाविले. त्यामुळे डॉली बिंद्राविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री डॉल बिंद्रा ही वादामुळे नेहमीच चर्चेत असते. यापूर्वी डॉली बिंद्राविरोधात यापूर्वी राधे माँने देखील कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बिंद्राला नोटीस देऊन लवकरच खार पोलीस चौकशी करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

English summary :
Dolly Bindra is once again involved in the controversy. In the Khar police station, Vc Fitness owner Zamek Malini has filed an FIR against Dolly. Senior police inspector Sanjay More said that the FIR has been filed on February 7 under sections 341, 447, 501, 504, 506 and 34.


Web Title: Dolly Bindra again in Bhopal; Filed in Khar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.