Doctor brutally killed wife by slitting her throat and crushing by car | धक्कादायक! जीवदान देणाऱ्या डॉक्टरनेच आधी चाकूने कापला पत्नीचा गळा, नंतर कारखाली चिरडलं...

धक्कादायक! जीवदान देणाऱ्या डॉक्टरनेच आधी चाकूने कापला पत्नीचा गळा, नंतर कारखाली चिरडलं...

तामिळनाडू (Tamil Nadu) च्या चेन्नईमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका डॉक्टरने त्याच्या पत्नीची निर्दयीपणे हत्या (Doctor Brutally Killed Wife) केली आहे. त्याने ज्याप्रकारे पत्नीची हत्या केली ते वाचूनच मनात धडकी भरते. डॉक्टरने आधी पत्नीचा गळा कापला (Doctor Slitted Wife's Throat) आणि नंतर तिला गाडीखाली चिरडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचं नाव गोकुल कुमार आहे. ३५ वर्षीय डॉक्टरने केवळ पत्नीचा निर्दयीपणे जीवच घेतला नाही तर (Doctor Brutally Killed Wife) सासऱ्यांसोबत वादही घातला. या घटनेनंतर जेव्हा डॉक्टर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याचा अपघात झाला. (हे पण वाचा : नशेत पत्नीला निर्वस्त्र करत जन्मोजन्मीच्याच जोडीदारानं केलं घृणास्पद कृत्य...)

पीडितेचं नाव कीर्थना होतं. २८ वर्षीय कीर्थना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्यूमन रिसोर्स मॅनेजर म्हणून काम करत होती. तर गोकुल एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करतो. पोलिसांनी सांगितले की, गोकुलने गेल्यावर्षी लॉकडाऊनपासून काम करणं बंद केलं होतं.

दोघांनी केलं होतं लव्ह मॅरेज

दरम्यान कीर्थनाची मोठी बहीण गोकुलच्या मोठ्या भावाची पत्नी आहे. या दोघांच्या लग्नातच गोकुल आणि कीर्थनाची भेट झाली होती. ज्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि नंतर त्यांनी लग्न केलं होतं. (हे पण वाचा : Ex-Boyfriend ने बसमध्ये तरूणीने ३० वेळा चाकूने केला सपासप वार, पण कुणी केली नाही मदत..)

शेजाऱ्यांनी सांगितले की, गोकुल आणि त्याच्या पत्नीचं नेहमीच भांडण होत होतं. लॉकडाऊननंतर तर भांडणांचं प्रमाण वाढलं होतं लॉकडाऊनमध्ये डॉक्टरने काम करणं बंद केलं होतं. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ६ महिन्यांआधी दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोघांना एकमेकांपासून वेगळं व्हायचं होतं. कारण त्यांच अजिबात पटत नव्हतं.

काय झालं त्या दिवशी?

शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता कीर्थना आणि गोकुल यांच्या काही गोष्टीवरून वाद सुरू झाला होता. ज्यानंतर गोकुल किचनमधून चाकू घेऊन आला आणि निर्दयीपणे आपल्या पत्नीचा गळा कापला. त्यानंतर त्याने पत्नीला कारखाली चिरडलं.
 

Web Title: Doctor brutally killed wife by slitting her throat and crushing by car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.