फाशी देण्यापूर्वी गुन्हेगाराच्या कानात जल्लाद काय सांगतो माहित्येय? वाचा....

By पूनम अपराज | Published: February 18, 2021 05:15 PM2021-02-18T17:15:41+5:302021-02-18T17:16:48+5:30

Jallad News : गुन्हेगाराला फाशी देण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आणले जाते, तरीही आमच्या दोघांची नजर एकमेकांकडे नसते. ”

Do you know what the executioner says in the criminal's ear before hanging? Read... | फाशी देण्यापूर्वी गुन्हेगाराच्या कानात जल्लाद काय सांगतो माहित्येय? वाचा....

फाशी देण्यापूर्वी गुन्हेगाराच्या कानात जल्लाद काय सांगतो माहित्येय? वाचा....

Next
ठळक मुद्देफाशी देण्यापूर्वी, जल्लादने दोषींच्या कानात क्षमा मागितली आणि म्हणाला, "मला माफ करा, मी एक सरकारी कर्मचारी आहे. मला कायद्याने भाग पाडले आहे."

नवी दिल्ली - अद्याप शबनमच्या मृत्यूच्या वॉरंटवर सही झालेली नसली तरी तुरुंगात फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पवन जल्लादही शबनमला फाशी देण्यास तयार आहे. फाशी देण्यापूर्वी पवनला शबनमला बरेच काही सांगायचे आहे. पण नियमांमुळे पवन आणि शबनम दोघांचीही एकमेकांवर नजर सुद्धा पडू शकणार नाहीत. याआधीही दोघांची भेट झालेली नाही. त्याचप्रमाणे निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यात आली.

पवन जल्लादने न्यूज 18 हिंदीला सांगितले की, "मला बर्‍याचदा निर्दयी स्त्रियांना खूप काही ऐकावावे आणि सांगायचे होते, परंतु मी नियमांना बांधील आहे. त्याला फाशी देण्यापूर्वी मी त्यांना सामोरे जाऊ शकत नाही. गुन्हेगाराला फाशी देण्यासाठी प्लॅटफॉर्मवर आणले जाते, तरीही आमच्या दोघांची नजर एकमेकांकडे नसते. ”
 

टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला उच्च न्यायालयाकडून दिलासा, तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर

 

Nirbhaya Case : दोषींना फाशी देण्याच्या ट्रायलसाठी जल्लाद तिहारमध्ये आला; पण आधी केली कोरोनाची चाचणी

 

पवन म्हणाला, "अशी एक किंवा दोन घटना घडल्या आहेत की, ज्याला फाशी देण्यात येते ती व्यक्ती फाशी घराची केली जाणारी व्यवस्था पाहून घाबरून जातो, तेथे उभे असलेला पोलिस दल आणि फाशी देणारा जल्लादला पाहून तो घाबरून जातो आणि त्याचा थरकाप उडतो. फाशीपासून दूर पळून जातो. म्हणूनच, आता सेलमधून बाहेर येताच आरोपीच्या तोंडावर काळा मुखवटा घालण्यात येतो.याद्वारे, तो ना फाशी देण्याची व्यवस्था पाहू शकत आणि ना जल्लादला पाहू शकत. निर्भयाच्या चार दोषींना फाशी घरात आणण्यापूर्वी त्याच्या तोंडावर काळ्या रंगाचा मुखवटा लावला होता."

 

 

Nirbhaya Case: 'मी पाच मुलींचा बाप, निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवून समाधान मिळेल': जल्लाद पवन



फाशी देण्यापूर्वी, जल्लादने दोषींच्या कानात क्षमा मागितली आणि म्हणाला, "मला माफ करा, मी एक सरकारी कर्मचारी आहे. मला कायद्याने भाग पाडले आहे." यानंतर जर गुन्हेगार हिंदू असेल तर तो त्याला राम-राम म्हणतो. जर एखादा मुस्लिम असेल तर शेवटच्या वेळेस तो त्याला सलाम करतो. पण पवन म्हणतो, "हे सर्व खोटे आहे." मी एखाद्या दोषीची क्षमा का मागितली पाहिजे? मुलीवर बलात्कार करणाऱ्या आणि तिच्याच कुटुंबातील लोकांचा हत्या करणार्‍या मुलीची मी माफी का मागितली पाहिजे? हे सर्व म्हणजे लोकांनी मनाने बनवलेली कहाणी आहेत."

Web Title: Do you know what the executioner says in the criminal's ear before hanging? Read...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.