ज्ञानदेव वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच; नवाब मलिकांना दिले 'हे' निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:32 PM2021-11-22T19:32:19+5:302021-11-22T19:32:59+5:30

Dnyandev Wankhede : नवाब मलिक यांना यापुढे माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश देण्यात आले आहेत. 

Dnyandev Wankhede is not get relief by the High Court; 'Hey' instructions given to Nawab Malik | ज्ञानदेव वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच; नवाब मलिकांना दिले 'हे' निर्देश

ज्ञानदेव वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच; नवाब मलिकांना दिले 'हे' निर्देश

Next

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार देण्यात आला आहे. नवाब मलिक यांना यापुढे माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश देण्यात आले आहेत. 

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर आज  उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिले होते . मलिक यांनी प्रसिद्धीपत्रक, मुलाखती आणि समाजमाध्यमांद्वारे वानखेडे कुटुंबीयांवर केलेली टिपणी छळवणूक करणारी व बदनामीकारक असल्याचे जाहीर करावे आणि त्यापोटी १.२५ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी विनंती वानखेडे यांनी दाव्यात केली होती.

मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांची बदनामी करणारी विधाने करण्यापासून व बदनामीकारक पोस्ट समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास कायमची मनाई करावी तसेच नुकसानभरपाई म्हणून सव्वा कोटी रुपयांची मागणी वानखेडे यांनी दाव्याद्वारे केली होती.  तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत त्यांना समाजमाध्यमांवर व पत्रकार परिषदेत वानखेडे कुटुंबीयांविरोधात काहीही न बोलण्याचे व पोस्ट करण्याचे अंतरिम मनाई आदेश द्यावेत, अशीही मागणी वानखेडे यांनी केली होती.

Web Title: Dnyandev Wankhede is not get relief by the High Court; 'Hey' instructions given to Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.