Delhi Violence : "या" पाच नावाने ओळखला जात होता अंकित शर्मा हत्येतील दुसरा आरोपी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 04:18 PM2020-03-12T16:18:11+5:302020-03-12T16:21:56+5:30

Delhi Violence : अंकितच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आणखी एकाला अटक केली

Delhi Violence: Ankita Sharma was the second accused known by the five names pda | Delhi Violence : "या" पाच नावाने ओळखला जात होता अंकित शर्मा हत्येतील दुसरा आरोपी 

Delhi Violence : "या" पाच नावाने ओळखला जात होता अंकित शर्मा हत्येतील दुसरा आरोपी 

Next
ठळक मुद्देदिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सलमान उर्फ नन्हे यांना अटक केली. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.आरोपीला मोमीन उर्फ सलमान उर्फ हसीन उर्फ मुल्ला उर्फ नन्हे असे पाच नावांनी ओळखले जाते.

नवी दिल्ली - इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी)  अधिकारी असलेल्या अंकित शर्माचा दिल्ली हिंसाचारात मृत्यू झाला होता. अंकितच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सलमान उर्फ नन्हे यांना अटक केली. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला मोमीन उर्फ सलमान उर्फ हसीन उर्फ मुल्ला उर्फ नन्हे असे पाच नावांनी ओळखले जाते. आरोपीला सुंदर नगरीमध्ये अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अंकित शर्माच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आपच्या निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनलाही अटक केली होती. त्याचे नाव एफआयआरमध्ये होते. काही दिवसांपूर्वी  दिल्ली हिंसाचार प्रकरण आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन कोर्टात आत्मसमर्पण केले होते. दिल्ली हिंसाचारादरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्माच्या हत्येचा ठपका ताहिरवर आहे. ताहिरने राउज अवेन्यू राउज एवेन्यू कोर्टात स्वत: ला न्यायव्यवस्थेसमोर सरेंडर केलं आणि मी निर्दोष असून नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे ताहिरने सांगितले होते.

 

खरंच अंकित शर्मा यांची हत्या करणाऱ्यांनी दिले 'जय श्रीराम'चे नारे?... जाणून घ्या सत्य

 

Delhi Violence: शरीरावर चाकूचे शेकडो वार करून अंकित शर्माला संपवले, पोस्टमार्टेममधून झाले उघड

Web Title: Delhi Violence: Ankita Sharma was the second accused known by the five names pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.